- कारवार : लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या समर्थनार्थ शनिवारी कारवार येथे भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये हजारो काँग्रेस कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्वतः हेल्मेट परिधान करून एका दुचाकी वरून या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले. डॉ. अंजली निंबाळकर या एक सक्षम व उत्साही उमेदवार म्हणून कारवार सह भटकळ या भागांमध्ये त्यांच्या पाठीशी अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला आहे. कुमठा येथे झालेल्या भव्य रोडशोप्रदर्शनानंतर कारवार येथे त्यांची भव्य रॅली झाली या रॅलीमध्ये त्यांनी स्वतः दुचाकीवरून सहभागी झाल्या. कारवार ,अंकोल्याचे आमदार सतीश सैल यांनी डॉक्टर अंजली निंबाळकर यांना साथ दिली. मोटरसायकल रॅलीला येथील मित्र समाज मैदानापासून सुरुवात करण्यात आली. रॅली काजू बाग, कोडीबाग रस्त्यावरून टोल नाका, संकेरी पर्यंत काढण्यात आली. त्यानंतर रॅली ची पुन्हा मित्र मैदानावरच सांगता करण्यात आली.
- या उत्साही रॅलीचा आनंद लुटण्यासाठी येथील मुख्य रस्त्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. एकंदरीत डॉ. अंजली निंबाळकर यांना कारवार जिल्ह्यातून जवळपास 70 टक्के पाठिंबा मिळेल असा आशावाद या भागातून व्यक्त होताना दिसतो आहे.
मच्छीमारी समाजाचा भरघोस पाठिंबा
- यावेळी डॉक्टरांजली निंबाळकर यांनी येथील मासळी मार्केटमध्ये दाखल होऊन मासळी विक्रेत्या महिला व ग्राहकांशी संवाद साधला.यावेळी निंबाळकर यांनी मच्छीमारी समाजाच्या विशेष करून मासळी विक्री करणाऱ्या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी वेगवेगळ्या जातीचे मासे हातात घेऊन माशीचे वैशिष्ट्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर निंबाळकर यांनी आपणाला मतदान करण्याचे आवाहन केले . मच्छीमारी समस्या सोडवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे यापुढेही करत राहील असे आश्वासन यावेळी समाजाच्या प्रमुख सह महिला व मतदारांना केले.