2026_03_01_18_58_50_838

खानापूर /प्रतिनिधी :

खानापूर तालुक्यातील चापगाव येथील सुप्रसिद्ध देवस्थान श्री फोंडेश्वर मंदिरात धाडसी चोरी झाली. ही गेल्या चापगाव गावच्या इतिहासातील शंभर वर्षातील सर्वात मोठी घटना म्हणावी लागेल. या ठिकाणी देवस्थानच्या जागृत महिमा असल्याने अनेक वेळा चोरीचे प्रयत्न झाले होते मात्र या ठिकाणी चोरट्याने तेथेच टाकून पोबारा केला असल्याचे प्रकार घडले होते पण आज रविवारी पहाटेच्या सुमारास श्री फोंडेश्वर मंदिरात झालेली ही चोरी या दैवताच्या प्रत्येक भक्ताच्या काळजाला वेदनादायी ठरणारी आहे. श्री फोंडेश्वर मंदिरात तब्बल 9.5 लाख रुपये खर्च करून कमिटीने दोन्ही देवावर चांदीचे मुकुट बसवले होते. दोन चांदीच्या मुकुटाचे वजन तीन किलो एकशे बावीस ग्रॅम इतकी असून त्याची एकूण किंमत साडेनऊ लाख इतकी आहे. सदर चांदीचे मुकुट अलीकडेच मंदिरात अलंकारिक करण्यात आले होते. गेल्या शिवरात्रीला गावच्या अनेक देणगीदारांच्या सहकार्यातून देवस्थान कमिटीने मुकुट बनवले होते.

सुरत आणि सुधनवा असे दोन पाषाणाचे देव असल्याने या ठिकाणी वेगवेगळी दोन मुकुटे बसवण्यात आली होती. चोरट्यानी समोरील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. व गाभाऱ्यातील खिडकी मधून आत प्रवेश करून सलगपणे ते दोन्ही मुकुट चोरट्याने लांबवले. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी देवस्थान कमिटीने मंदिरात सीसीटीव्ही कॅमेराही बसवला होता. मात्र तो गेल्या 23 तारखेपासून बंद असल्याने पोलिसांना तपासात अडथळा आला आहे. घटनास्थळी स्वानपथक तसेच ठसे तज्ञाना प्राचारण करण्यात आले. स्वान पथकाने अवघ्या 200 फुटापर्यंत जाऊन तेथेच घोटमळले. त्यामुळे पुढील तपास थांबला नंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक धर्मट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन आपल्या पोलीस पथकासमवेत अनेक ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपाशीचे काम सुरू आहे.

ग्रामस्थांनी गावात तातडीने वार पळून बैठक बोलावली. व फोन्डेश्वर समोर गाऱ्हाणा घातला. बैलूर येथील चोरट्यांचे चापगावात लोकेशन! गेल्या आठवड्याभरात खानापूर तालुक्यात अनेक ठिकाणी घरपोडी झाल्याचे प्रकार दिसून आले आहेत. शनिवारी रात्री तालुक्यातील बैलूर येथे घरफोडी झाली. यामध्ये अलगदपणे तीन चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांना पोलीस ठाण्यात कैदेत ठेवण्यात आले आहे. या चोरट्या पैकी एकाचे मोबाईल लोकेशन चापगाव येथे शनिवारी दुपारी झाल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. परंतु हे तीनही चोरटे पोलिसांच्या नजर कैदेत असताना चापगाव मध्ये चोरी प्रकरणात त्यांचा सहभाग आहे का ? की, या चोरीमध्ये दुसरे कोणी चोर आहेत याचा पोलीस तपास करत आहेत.

Do Share
error: Content is protected !!
Call Us