खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील श्री महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटी संचलित शांतिनिकेतन पब्लिक शाळा व विद्याभारती कर्नाटक बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव जिल्हास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन उद्या शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून आयोजित करण्यात आले आहे या मेळाव्यात बेळगाव जिल्ह्यातील एकूण आठ नामांकित शाळांतील 200 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात विज्ञान गणित, वैदिक गणित, संस्कृत या विषयावर विविध प्रयोग मॉडेल प्रश्नमंजुषा संस्कृतपठण प्रदर्शित करण्यात येणार आहेत. तरी सर्व पालक व विद्यार्थ्यांनी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत या खुल्या प्रदर्शनासाठी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन शांतीनिकेतन पब्लिक शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.