IMG-20250830-WA0033

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :

क्रीडा हा शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. तो शिक्षणाबरोबर विकसित करण्यासाठी गेली अनेक वर्षे मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ राजश्रीताई नागराजू या प्रयत्नशील आहेत.
अभ्यासाबरोबरच खेळाडू विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान द्यावं ही त्यांची मनस्वी धारणा असून आज या संस्थेच्या विविध शाळा-काॅलेजीस् मध्ये शिकणारे खेळाडू विद्यार्थी याच दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत.
म मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या खेळाडू विद्यार्थिनी या नेहमीच क्रिडाक्षेत्रात अग्रेसर असतात. यावर्षीही येथील के एल ई काॅलेज खानापूर व पदवीपूर्व शिक्षण विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेत म मं ताराराणीच्या विद्यार्थ्यांनीनी नेत्रदीपक कामगिरी करीत मुलींच्या विभागातील चँपियनशिप उत्तम गुणवत्तेच्या जोरावर निर्विवादपणे खेचून आणले आहे.


कबड्डी व खो-खो या तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या क्रीडा प्रकारात अंतिम सामन्यात या महाविद्यालयांने प्रथम क्रमांक मिळवित आपली यशोमय परंपरा कायम ठेवली आहे.
खो खो मध्ये एकापेक्षा एक मातब्बर संघाचा पराभव करीत ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयांने अंतिम सामन्यात बलाढ्य माऊली पदवीपूर्व काॅलेज गर्लगुंजी यांना मात देत, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी पक्की केली आहे .
खो खो कॅप्टन कुमारी निलम कक्केरकरीकर,कु. साक्षी दौलतकर व कुमारी निलम यांच्या अष्टपैलू खेळामुळे आठ गड्यांच्या फरकाने माऊली संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक बरोबर उपस्थित क्रीडाप्रेमींची मनं ही जिंकली .
याच बरोबर कबड्डी मध्ये उपांत्य फेरीत तुल्यबळ एम जी काॅलेज नंदगडचा पराभव करून अंतिम सामना एम एम काॅलेज खानापूर संघाबरोबर मोठ्या फरकाने जिंकून कॅप्टन कुमारी लक्ष्मी गोरल व स्टार रेडर कुमारी साधना होसुरकर यांनी ताराराणीची अनेक वर्षाची विजयाची श्रृंखला अबाधित राखली आहे!

तसेच 4 X100 रिले मध्ये आपली धावण्याची कौशल्ये पनाला लावून काॅलेजच्या जलद धावपटू कुमारी निलम हुक्केरीकर, कुमारी अपेक्षा निलजकर,कुमारी लक्ष्मी हंगिरकर,कुमारी प्रणाली पाटील यांनी रिलेमध्ये पहिला क्रमांक मिळविला.
याच शिवाय कु. अंजली कदम गोळा फेक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला, गोळाफेक द्वितीय कुमारी साधना होसुरकर तर कु. स्वाती एस. पाटील हिने बुध्दिबळ मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. कुमारी . प्रणाली पी. पाटील हिने लांब उडी, ट्रिपल जंपमध्ये व 100 मी. हर्डलस् या तिन्ही खेळांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविकावून काॅलेजला सर्वसाधारण जेतेपद मिळवून देण्यात बहुमोल भर घातली.
या उज्ज्वल क्रीडा यशाबद्दल मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू मॅडम यांनी दूरध्वनीवरून सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून संस्थेचे कार्यकारी ज्येष्ठ संचालक श्री परशराम आण्णा गुरव व श्री शिवाजीराव पाटील, हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव यांनी खेळाडूंचे मनोधैर्य वाढवत कौतुक केले आहे.
सदर खेळाडू विद्यार्थीनींना प्राचार्य अरविंद पाटील यांचे प्रोत्साहन मिळत असून, कालेजच्या क्रीडा विभाग प्रमुख श्रीमती एम वाय देसाई व शिक्षकवर्ग आणि कर्मचारीवर्ग ही विजयी परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
कबड्डी कोच श्री भरमाजी पाटील, श्री आप्पाजी पाटील, तडफदार युवा खो खो कोच श्री प्रशांत पाखरे, श्री श्रीधर मळीक व श्री भिमसेन यांचे अचूक मार्गदर्शन लाभत आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us