Screenshot_2025-07-09-13-33-20-65_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :

चापगाव ते जळगा या रस्त्यावर डोंगरी माळ जवळ एक भली मोठी चर रस्त्या मधोमध पडल्याने या ठिकाणी अपघाताला निमंत्रण झाले आहे. गेल्या आठ-दहा दिवसापासून पावसामुळे रस्ता पूर्णतः खचून मोठी चर पडली आहे. यामुळे सुसाट येणारी दुचकी चारचाकी वाहने अपघात होत आहेत. यासाठी तातडीने ही चर मुजवण्यात यावी अन्यथा या ठिकाणी झालेल्या अपघाताला हेब्बाळ ग्रामपंचायत जबाबदार राहील असा इशारा चापगावातील काही युवा वर्गाने केला आहे.

सदर चर हेब्बाळ ग्रामपंचायतीने कारलगा या ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी खुदाई केली आहे. मलप्रभा नदी हुन कारलगा गावाला पाणीपुरवठा साठी या ठिकाणाहून पाईपलाईन घालण्यात आली आहे असे समजते. पाईपलाईन घातल्यानंतर या ठिकाणी भक्कम माती टाकून रस्त्यावर अडचण येणार नाही याची काळजी ग्रामपंचायतीने किंवा त्या कंत्राटदराने घेणे गरजेचे होते. गेल्या पंधराव्यापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे रस्त्यावरील चर पुन्हा मोठी झाल्याने या ठिकाणी सुसाट येणाऱ्या वाहनधारकांना अपघाताला निमंत्रण झाले आहे. यासाठी ग्रामपंचायतीने याची तातडीने दखल घ्यावी अशी सूचना खानापूर लाईव्ह च्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us