खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
गेल्या अनेक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतिष्ठित असलेल्या नंदगड येथील संगोळी रायान्ना वीरभूमीचे उद्घाटन येत्या 16 ऑगस्ट रोजी करण्याचा निर्णय आज बुधवारी बेंगलोर येथे झालेल्या कर्नाटक राज्य प्राधिकरण मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निमित्ताने आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी कन्नड व सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी होते. या बैठकीला खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, बैलहोंगलचे आमदार कौजलगी राज्य ग्यारंटी हमी योजनेचे अध्यक्ष एच.एम रेवांना यासह आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते. कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने अनेक विकास कामे राबवण्यात आले आहेत. नवीन कामांचीही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या सर्व कामांचा आढावा बैठक या बैठकीत घेण्यात आला. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी नंदगड येथील संगोळी रायान्ना प्राधिकरणाच्या वीर भूमीच्या विकासासंदर्भात तसेच तालुक्यातील विविध विकासकामा संदर्भात माहिती दिली.यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष व कन्नड आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री शिवराज तंगडगी यांनी खानापूर तालुक्याच्या भौगोलिक सांस्कृतिक विकासाचा आढावा करण्यासंदर्भात यावेळी आश्वासन दिल्याचे समजते. येत्या 25 जुलै रोजी दौऱ्यावर येणार असून या उद्घाटन समारंभ संदर्भात अधिक माहिती घ्यावी दिली जाणार आहे. एकंदरीत नंदगड येथील संगोळी रायण्णा समाधी स्थळाच्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून प्राधिकरणाच्या वतीने वीरभूमी निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये म्युझियम सह संगोळी रायण्णा यांच्या जीवनपटलावर जिवंत देखावे उभारण्यात आले आहेत. यामुळे सदर वीरभूमी एक भविष्यात खानापूर तालुक्यातील एक पर्यटन स्थळ होणार आहे.