Oplus_16777216

Oplus_16777216

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : चापगाव येथील सनदी परिवाराच्या आधारवड तसेच चापगाव ग्रामपंचायतीच्या माजी उपाध्यक्ष श्रीमती शरीफाभी दादासाहेब सनदी (वय 98) यांचे मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात सात मुलगे, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. त्या चापगाव पिकेपीएस चे संचालक सिकंदर सनदी तथा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष,विद्यमान सदस्य नजीर सनदी यांच्या मातोश्री होत. त्यांचा अंत्यसंस्कार उद्या बुधवार दि. 9 रोजी सकाळी साडेनऊ वाजता चापगाव येथे होणार आहे.

श्रीमती शरीफाभी सनदी ह्या चापगाव गावातील एक जाणकार व्यक्तिमत्व म्हणून परिचित होत्या. परखड व्यक्तिमत्व आणि समाजाबरोबर झगडत जाणाऱ्या व आपुलकीची छाप टाकणाऱ्या त्या एक जेष्ठमाता म्हणून परिचित होत्या. त्या मुस्लिम असल्या तरी गावाबरोबर प्रेमाने राहून सर्वांना आपलंसं करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये होती. त्यांचे पती दिवंगत दादासाहेब सनदी यांनी घालून दिलेल्या लक्ष्मण रेषेसी बांधीला राहून त्यांच्या परिवाराने गावाबरोबर चांगले नाते जोडण्याचा कायम प्रयत्न केला आहे. त्यामध्ये श्रीमती शरीफाबी सनदी यांनी ग्रामपंचायतीवर दोन वेळा सदस्य एक वेळा उपाध्यक्ष पद सांभाळत गावच्या विकासात मोलाचा वाटा ठेवला आहे त्यामुळे आज त्या सर्व जनमाणसात राजकीय नेतृत्वात “अम्मा ” या नावे ओळख होती. गेल्या अनेक दिवसापासून त्या वृद्धापलाने मृत्यूची झुंज देत होत्या. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावांमध्ये एक जानते व्यक्तिमत्व गेल्याची खंत निर्माण झाली आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us