Oplus_16777216
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : खानापूर शहराच्या प्रवेशद्वारावरील मुख्य रस्त्यावरील त्या ” खड्ड्यांच्या दुरुस्तीचा मुहूर्त कधी येणार? याला कोण वाली आहे का? असे मनात निशब्द येऊन जातात आणि हा खड्डा पार करताना वाहनधारकांची होणारी कसरत पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनधारकाला विचार करणारी ठरते. आपले वाहन कोणत्या दिशेने घालावे. हा विचार मनात घेऊनच वाहनधारकाला खड्ड्याचा सामना करावा लागतो. हा सगळा प्रकार खानापूरच्या प्रवेशद्वारावर दोन ठिकाणी घडतोय तो म्हणजे रूमेवाडी नाक्याजवळील मुख्य रस्त्यावर तसेच पारिशवाड क्रॉस पासून हाकेच्या अंतरावर स्वा-मिलच्या बाजूला होय.
खरंतर दोन्ही मुख्य रस्ते हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अगत्यारीत येतात. या मुख्य रस्त्यावरून नंदगड ज्या दिशेने अथवा पारिशवाडच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक शासकीय अधिकारी असोत किंवा लोकप्रतिनिधीना या खड्ड्यांचा धक्का बसतोच. मात्र हे खड्डे बुजवण्याचे सौजन्य मात्र संबंधित विभागाला व लोकप्रतिनिधींना दिसत नाही का? हे नवलच.
पारिशवाढ क्रॉस जवळ पडलेला हा खड्डा जणू मृत्यूचाच सापळा बनला आहे. पाच वर्षांपूर्वी खानापूर ते शांतिनिकेतन पर्यंत या रस्त्याला तब्बल दोन कोटीचा निधी मंजूर झाला होता. रस्ता ही सुसज्ज झाला मात्र या ठिकाणचे खड्डे बुजवण्यासाठी या विभागाने कधीच सौजन्य दाखवले नाही. या पारिषवाढ रोडच्या नाल्यावरील ब्रिजवर पडलेले खड्डे अवघड नाहीत. मात्र शहराजवळच स्वा- मीलच्या बाजूला पडलेले खड्डे मात्र नक्कीच विचार करणारे ठरले आहेत. या परिसरात वाहनांची मोठी गर्दी आहे, वर्दळ आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना या खड्ड्यातून जाताना रस्ता शोधावा लागतोय. लहान वाहने अडकत आहेत, अनेक वेळा अपघातही घडले आहेत, गेल्या पंधरा-वीस दिवसापासून हा खड्डा दिवसेंदिवस मोठा होत आहे. मात्र हा खड्डा बुजवण्यासाठी मात्र सार्वजनिक बांधकाम खाते मात्र बुजवण्याचे सौजन्य घेत नाहीत. . तालुक्याचे लोकप्रतिनिधींनी ही दैनंदिन याच रस्त्यावरून येता करतात. पण ह्या खड्ड्यात आपले वाहन अडकत नाही ना? याचा विचार त्यांनी केला तर नवल नाही.
अशीच दयनीय अवस्था खानापूर करंबळकत्रीपर्यंत झाली आहे. रुमेवाडी नाक्यापासून करंबळ कत्री कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था ही काही नवीन नाही. या रस्त्यावरून अनेकवेळा राजकारणही गाजले. आम्ही काय करू? असे असे बॅनरही झळकले. पण या खड्ड्यांच्या विकासाचे भाग्य काही उजळत नाही असे दिसून येते.
खरंतर राष्ट्रीय महामार्ग या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. काम करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी करंबळ कत्री जवळ एक मोठा प्लांटही पडला आहे. पण या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हात घालण्यापूर्वी वरुणराजाने मुहूर्तात खोडा घातला. आणि काम सुरू होताच थांबले. खरंतर यावर्षी हे काम करण्यासाठी लोकप्रतिनिधीने शक्ती पणाला लावली. पण शुभारंभाचा मुहूर्त आलाच नाही. त्यामुळे यावर्षीचा या रस्त्याचा मुहूर्तही टळला आणि पुन्हा एकदा तालुक्यातील प्रवाशांना या खड्ड्याचा सामना करावा लागला. दिवसेंदिवस खड्ड्यातील ताण वाढतोय मात्र दुरुस्तीचे सौजन्य दिसत नाहीये याचा खेदही वाटतोय. यावर्षी सततदार पावसामुळे खानापूर तालुक्यातील अनेक रस्ते खड्डे झाले आहेत. हे तालुक्याला काही नवीन नाही मात्र शहराच्या प्रवेश सुधारावर पडलेले दोन रस्त्यावरील मुख्य रस्ते हे तातडीने बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने क्रम घ्यावेत पावसाळ्यात रस्ता करणे शक्य नाही हे सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र त्या खड्ड्यात गाड्या अडकणार नाहीत याचे सौजन्य घेऊन रस्त्यावरील पडलेले खड्डे तात्काळ मुजवण्यासाठी प्रयत्न केले तर प्रवाशांना दिलासा मिळेल यात शंका नाही.