Oplus_16908288

Oplus_16908288

खानापूर लाईव्ह न्यूज /प्रतिनिधी :
येथील मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालयाने बारावीच्या निकालात आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही विभागांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, महाविद्यालयाचा एकूण निकाल ७८% लागला आहे.

निकालाची वैशिष्ट्ये:
यावर्षी परीक्षेला एकूण ३३२ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी २५५ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. शाखानिहाय निकालात विज्ञान विभागाने बाजी मारली असून या विभागाचा निकाल ८८.२% लागला आहे. वाणिज्य विभागाचा निकाल ७६% तर कला विभागाचा निकाल ३९% इतका लागला.

कु. कांचन धुरी 566 गुण (94.33%) गुण घेऊन कॉलेज मध्ये प्रथम आली. कु. सामिया धामणेकर, ५५४ गुण (९२.०३%),कु मधुराणी मालशेत, ५५३ गुण (९२.०१%), कु श्रावणी गोरल ५५२ गुण ५५२ (९२%), कु. साक्षी पाटील 552 गुण (92%),कु. भक्ती बैलूरकर 550 गुण (91.66%) , कु. अनुराधा पाटील 542 गुण (90.33%)घेऊन कॉलेजला टॉपर ठरल्या आहेत.

कला विभाग 39% निकाल : त्यामध्ये कुमारी आशा आरेर ५५० गुण (९१.६६%), कु. ऐश्वर्या कुगी 535, कु. ऋतुजा चापगावकर 524 गण (87 33%) गुण यश साधले आहे.

गुणवंतांची कामगिरी:
विज्ञान शाखेतील २५ विद्यार्थ्यांनी ‘विशेष प्रावीण्य’ (Distinction) श्रेणी मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. तसेच १५८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ५९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये कुमारी कांचन धुरी हिने ६०० पैकी ५६६ गुण (९४.३३%) मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. तिच्यासह इतर अनेक विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश संपादन केले आहे.

अभिनंदन आणि शुभेच्छा:
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद आणि व्यवस्थापन समितीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us