IMG-20260410-WA0015

खानापूर:
मराठा मंडळाच्या म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाने २०२६ च्या पी.यू.सी. द्वितीय वर्ष निकालात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या महाविद्यालयाने केवळ खानापूर तालुक्यातच नव्हे, तर बेळगाव जिल्ह्यातही अव्वल स्थानावर झेप घेत देदीप्यमान यश संपादन केले आहे.

वाणिज्य शाखेचा सुवर्णयोग:
वाणिज्य विभागात कुमारी सबिना एल. लोबो (९८.३३%) हिने तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. पाठोपाठ कुमारी समीक्षा एस. झुंजवाडकर (९८%) आणि कुमारी राजेश्वरी पी. राठोडकर (९६.३३%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून तालुक्यात ताराराणीच्या यशाचा झेंडा फडकवला. या तिन्ही विद्यार्थिनींनी बेळगाव जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीतही मानाचे स्थान मिळवले आहे. वाणिज्य विभागाचा एकूण निकाल ८६.५३% लागला असून अनेक विद्यार्थिनींनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.

कला शाखेची यशस्वी घोडदौड:
कला विभागात कुमारी स्वेता एन. घाडी (८५%) हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर कुमारी संजना कांबळे (८३%) आणि कुमारी मधुरा खांबळे (८२%) यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. कला विभागाचा एकूण निकाल ७५.९२% लागला आहे.

यशाची आकडेवारी:

  • एकूण निकाल: ८३%
  • विशेष श्रेणी (Distinction): ७९ विद्यार्थिनी
  • प्रथम श्रेणी: २७ विद्यार्थिनी
  • द्वितीय श्रेणी: ११ विद्यार्थिनी

यशाचे शिल्पकार:
या अभूतपूर्व यशाबद्दल मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यादव मॅडम, संचालक श्री. शिवाजीराव पाटील, श्री. परशुराम गुरव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. प्राचार्य श्री. अरविंद लक्ष्मणराव पाटील यांचे अचूक नियोजन आणि सर्व शिक्षक वृंदाच्या मेहनतीमुळेच हे ‘गौरवशाली यश’ साध्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे.


🏆 निकालाचा गुलाल! खानापुरात ताराराणींचा झेंडा! 🏆

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूरच्या विद्यार्थिनींचे पी.यू.सी. परीक्षेत नेत्रदीपक यश!

तालुकात प्रथम: सबिना एल. लोबो (९८.३३%)
तालुकात द्वितीय: समीक्षा एस. झुंजवाडकर (९८%)
तालुकात तृतीय: राजेश्वरी पी. राठोडकर (९६.३३%)

✅ ७९ विद्यार्थिनी विशेष श्रेणीत उत्तीर्ण!
✅ वाणिज्य विभाग निकाल: ८६.५३%
✅ कला विभाग निकाल: ७५.९२%

सर्व


Do Share
error: Content is protected !!
Call Us