चापगावात आज श्री दुर्गादेवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम
चापगावात आज श्री दुर्गादेवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम
दुपारी महाप्रसाद, रात्री श्रीकृष्ण पारिजात नाटकाचे आयोजन
चापगाव / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील चापगाव (चंपावतीनगर) येथील श्री दुर्गादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी ११ वाजता श्री दुर्गादेवीची ओटी भरण्याचा विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आमदार विठ्ठल हलगेकर विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप नेते प्रमोद कोचेरी, संजय कुबल, ज्योतिबा रेमाणी, सदानंद पाटील सह मान्यवर मंडळींना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चापगावचे प्रगतिशील शेतकरी अर्जुन बसप्पा मादार राहणार आहेत. तसेच सभामंडप उद्घाटन, दीपप्रज्वलन आणि मान्यवरांचा सहभाग असलेले विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दुपारी महाप्रसाद, रात्री नाट्यप्रयोग
मंगळवारी दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री ९ वाजता श्रीकृष्ण पारिजात, लोकापूर या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चापगाव पंचक्रोशीतील नागरिक, सर्व युवक मंडळे, स्वसहाय्य संघ आणि वारकरी सांप्रदायिक मंडळींसह ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.
तरी परिसरातील भाविकांनी व नागरिकांनी उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन आयोजकांनी केले आहे.