Oplus_19006496

Oplus_19006496

खानापूर,

दि. ५ मे:खानापूर-जांबोटी मार्गावरील रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरासाठी वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, उद्या ६ मे पासून सुरू होणाऱ्या बैलूर देवाची हट्टी, बाकनूर आणि मोरब गावातील महालक्ष्मी देवी यात्रेमुळे भाविकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. खानापूर तालुक्याच्या ठिकाणी यात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या अक्षता रोपण कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जाण्याची शक्यता आहे. पण खानापूर जांबोटी हा रस्ता आणखी दोन दिवस बंद राहणार असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होणार आहे. परिणामी किरणवाडी मार्गे लांबचा रस्ता पकडून बैलूरला जाणे अनिवार्य ठरणार असल्याने

पंधरा वर्षांची प्रतीक्षा आणि प्रवासाचा अडथळा:

तब्बल १५ वर्षांच्या दीर्घ काळानंतर ही यात्रा होत असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. चारही गावांनी विद्युत रोषणाई आणि सुशोभीकरणासह जय्यत तयारी केली आहे. या यात्रेसाठी कर्नाटकसह गोवा आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक येणार आहेत. मात्र, मुख्य मार्ग बंद असल्याने भाविकांना लांबचा वळसा घालून यावे लागणार आहे.

पहाटेच्या ‘अक्षता’ कार्यक्रमाला फटका:

यात्रेतील सर्वात महत्त्वाचा सोहळा म्हणजे ‘पहाटेची अक्षता’. या कार्यक्रमासाठी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी होते. रस्ता बंद असल्याने पहाटे प्रवास करणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार आहे.

स्थानिकांची मागणी:

यात्रेचे महत्त्व आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन, किमान यात्रेच्या कालावधीत तरी रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी खानापूर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास यात्रेच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us