Screenshot_20240504_231438

नंदगड येथे भाजपाची भव्य प्रचार सभा!

  • खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: नंदगड : देशाच्या लोकसभेची 17 वी निवडणूक ही देशाचा मान सन्मान व मतदारांचा गौरव वाढवणारे आहे. संपूर्ण जगभराचे लक्ष लागलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा देशात पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध देश बनवण्यासाठी सत्ता स्थापन होणार याकडे लक्ष लागले आहे. देशातील नागरिकांनी एक हाती सत्ता देऊन देशाला यावेळी समृद्ध बनवण्यासाठी 400 पारचा नारा दिला आहे. याला संपूर्ण देश समर्थ साथ देईल यात शंका नाही. भाजप सरकारने शेतकरी, महिला व युवकांना तसेच सर्व स्थरातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. देशात कल्याणकारी योजना राबविल्या, त्यामुळे अवघ्या दहा वर्षात भाजप सरकारने लोकप्रियता मिळवली आहे. तसेच पाचशे वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या राम मंदिराची उभारणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संपूर्ण जगात सन्मान मिळवून दिला आहे. नवीन शिक्षण पद्धती अमलात आणून युवकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन, बेरोजगाराची समस्या मार्गी लावली आहे. आता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी सरकार सत्तेत येणार आहे. कारवार लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या कमळाला म्हणजेच मला मतदान देऊन, या भागाचा विकास करण्याची संधी द्यावी. खानापूर तालुक्यातून उच्चांकी मतदानाची यावेळी देखील सीमारेषा दाखवावी आपण प्रामुख्याने खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू असे आश्वासन उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्राचे भाजपा उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी नंदगड येथील भाजपाच्या प्रचार सभेत केले. सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे माजी अध्यक्ष विठ्ठल पाटील होते.
  • यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, जेडीएस चे नेते नासिर बागवान, भाजपा युवा नेते पंडित ओगले, यांची सभेला मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. भाजपा जिल्हा जनरल सेक्रेटरी धनश्री सरदेसाई, लैला शुगर एमडी व व भाजपा युवा नेते सदानंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतिबा रेमानी, सुरेश देसाई, शंकर सोनोळी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सेक्रेटरी पंडित ओगले, नंदगड ग्रामपंचायतचे अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, मंजुळा कापसे, तसेच हलशी नंदगड भागातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us