
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: वड्डेबैल येथे प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित खळ्याच्या कुस्ती मैदानमध्ये यळुर चा पैलवान निरंजन हा पैलवान विजेता ठरला. आखाड्यात प्रथम क्रमांक ची कुस्ती निरंजन यळूर विरुद्ध पैलवान नारायण आलारवाड यांच्यात झाली. ही कुस्ती लैला साखर कारखान्याचे एमडी. भाजप नेते सदानंद पाटील, भाजपाचे तालुका प्रदान कार्यदर्शी मल्लाप्पा मारिहाळ, ग्रामपंचायत माजी अध्यक्ष कल्लापा पाटील आदींचे हस्ते लावण्यात आले. तर द्वितीय क्रमांकाची कुस्ती शिवराज इटगी विरुद्ध रोहित माचीगड यांच्यात झाली. यामध्ये शिवराज इटगी हा पैलवान विजयी झाला. त्याचप्रमाणे या कुस्ती मैदानात आकाश धारवाड दत्ता पाटील आनंद शिंदोली, रुद्राप्पा मल्लापुर, दर्शन इटगी प्रदीप वड्डेबैलं, विक्रांत वड्डेबैल या पैलवानी विजय मिळविला. त्यांना पंच कमिटीच्या वतीने बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दरवर्षी महाशिवरात्रीला श्री रामलिंगेश्वर देवस्थानाच्या नावाने यात्रोत्सव व खळाच्या कुस्त्या आयोजित केल्या जातात.