वैचारिक दिवाळखोरी…संपादकीय
खरंतर गेल्या 70 वर्षात मराठा अन मराठी पणाला मानाचा तुरा आणि सन्मानाचे स्थान देण्याचे काम उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाने केला आहे. याची जाण प्रत्येक मराठी मनानं जपली. मानवतेचा मनाचा मोठेपणा करत जीवनाच्या वाटेवर जाताना अनेक काठ्याकुट्याने भरलेल्या वाटा तुडवत यशाची वाटचाल करण्यासाठी प्रत्येकाची धावपळ असते. तसंच काही राजकारणातही असते. मनातली माणसं आणि आपली माणसं जेव्हा एखाद्या रणांगणाच्या समोर येतात. त्यावेळी भाषा, भेदभाव ,जात, आपलं, परप्रांतीय असे म सर्व मतभेद बाजूला ठेवून आपली माणसं जोडण्याची संधी क्वचित येते. अशातलाच एक भाग म्हणजे आमच्या खानापूर तालुक्याला मिळालेला एक सन्मान मनावा लागेल. खानापूर सारख्या दुर्गम भागात लोकसभेच्या रणांगणात डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना मिळालेली काँग्रेस पक्षाची उमेदवारी सन्मानपूर्वक आहे. असे असताना मराठी व मराठा माणसाच्या मनात कालवली जाणारी वैचारिक दिवाळखोरी ही बरी नव्हे .
खरंतर मराठी मनाचं आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपति शिवराय म्हणजे आपलं अस्तित्व! आपला मान! आपली मर्यादा! आपलं जीवन! आपला श्वासच…
‘शिवाजी महाराज की’ म्हणून कुणी ओरडलं तर मेलेलं मढं सुद्धा ‘जय’ म्हणत जीवंत होईल आपलं!
महाराष्ट्रातील शिवनेरीवर जन्मलेला शिवबा आपला,
महाराष्ट्रातील पंढरपूरचा विठोबा आपला,
कोल्हापूरची अंबाबाई आपली आईच,
महाराष्ट्राचा जोतीबा आपला,
शिर्डीचे साईबाबा आपले,
अगदी मुंबई पुण्याशी आपला रोटीबेटीचा व्यवहार,
घरातलं कुणी महाराष्ट्रात काम धंद्यासाठी, नोकरीसाठी गेलं तर किती ते कौतुक,
आपल्याला लग्नासाठी महाराष्ट्रातील मुली चालतात,
आपल्याला मुलींनी मुंबई पुण्यात नांदावं हे अगदी अभिमानाचं आम्हाला,
गुजरातचा माणूस वाराणसीतून निवडून येतो तर किती कौतुक आम्हाला? मग आपल्या शिवबाच्या घरातली महाराष्ट्राची लेक आपल्या राजकीय अंगणात आपल्याला का बरं चालतं नाही!!!
का बरं ही वैचारिक दिवाळखोरी?
मराठमोळ्या डॅा अंजलीताई ला आज आपलं दिल्लीत प्रतिनिधित्व करायची संधी कधी नाही ती आलेय आणि आपल्यातले काही करंटे स्वतःच्या राजकीय आकसापोटी आतलं आणि बाहेरचं राजकारण करत बसले आहेत. त्यांच्याकडे लक्ष नंतर देऊ कधी तरी.
सध्या लक्ष्य एकच!
यंदा खानापूरचाच खासदार करायचा आणि आपल्या तालुक्याला खासदारकी आणायचीच! सर्व मतभेद विसरून आणि सर्वांना एकत्र घेऊन सर्वांनी आता एकच लक्ष ठरवलं पाहिजे की खासदार खानापूरचाच होणार,