Oplus_16777216

Oplus_16777216

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी : बेळगाव पणजी व्हाया चोरला मार्ग नेहमी वाहतुकीचा बोजवारा व अडचणीचा ठरत आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक अवजड ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने दुसरी अवजड ओव्हरटेक करून जात असताना पलटी होऊन या मार्गावरील वाहतूक सोमवारी (आज दि.1 सप्टेंबर) पहाटेपासून पूर्णतः ठप्प झाली आहे.

Oplus_16777216

जांबोटी पासून काही अंतरावर कालमनी ते आमटे दरम्यान सदर वाहतूक टप झाले असून दुथर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास जांबोटी होऊन गोव्याच्या दिशेने जाणारी एक अवजड ट्रक मधोमधीच बंद पडली होती. त्या ट्रकला ओव्हरटेक करून दुसऱ्या बाजूने येणारी आणखीन एक अवजड ट्रक येत असताना रस्त्याकडेला रुतून तेथेच पलटी झाल्याने रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः झाली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला जवळपास दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास सदर दोन्ही वाहनांना अपघात झाल्याने रात्रीपासून अनेक वाहनधारक या वाहतुकीत अडकल्याने प्रवासी वर्गाचा गोंधळ उडाला आहे. अनेक बसेस देखील या रस्त्यात अडकल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. त्यातच रात्रीपासून या भागात पावसाची सतत रिपदीप सुरू आहे त्यामुळे गोयाहून बेळगावच्या दिशेने व बेळगावहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या अनेक प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. पहाटेपासून अनेक शाळकरी विद्यार्थी बेळगाव भागात शाळेला ये,जा करतात. परंतु रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः झाल्याने विद्यार्थ्यांची व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. चोरला रस्ता नेहमी अडचणीचा ठरत आहे. या रस्त्यावर मोठी अवजड वाहतूक ही नेहमी डोकेदुखी ठरत आहे. अवजड वाहतुकीवर बंदीचे नियम केवळ घोषणा होत असल्याने या भागातील विद्यार्थ्यांसह प्रवासी वर्गांची होणारी कुचंबना कधी थांबेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज सोमवारी पहाटेपासून या राज्यमार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने आता त्या दोन्ही अवजड वाहनांना निकामी करीतो पर्यंत हा रस्ता खुला होणे शक्य नाही. शिवाय वाहने येण्या-जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे वाहनधारकांची गोची झाली आहे.

सौजन्य…. दत्ता फोटो.. खानापूर
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us