कारवार लोकसभा निवडणूक २०२४ :
- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा कोस्टल भागात जोरात प्रचार सुरू आहे. कारवार जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये विभाग व बैठकांचे नियोजन सुरू असून त्या भागातून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्याच पद्धतीने खानापूर तालुक्यातून ही अनेक राजकीय व सामाजिक तसेच सहकार क्षेत्रातील मंडळींनी डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून प्रदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भेटीसाठी घेऊन प्रचाराला वेग आणला आहे. शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्लगुंजी ,तोपिनकट्टी भागात आपला प्रचार केला. या भागातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन डॉ. अंजलीताई निंबाळकर या आपल्या तालुक्याच्या माजी आमदार असून त्यांनी केलेली विकास कामे व लोक संपर्क हा सर्वांना माहित आहे. सद्य परिस्थितीत त्या एक मराठा समाजातील प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेला उभ्या असून आज समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी प्रत्येक मराठा समाजातील माणसाने आज डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या पाठीशी रहावे अशी विनंती प्रदेश काँग्रेस पक्षाच्या तसेच समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली.
- कारवार लोकसभा मतदार संघ आकाराने खूपच मोठा आहे, 14 तालुके या मतदार संघात येतात तसेच 8 विधानसभा मतदार संघाचा मिळून हा लोकसभा मतदार संघ बनला आहे त्यामुळे स्वत: उमेदवार सगळीकडे प्रचार करणे शक्य नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आहे.
- गर्लगुंजी या ठिकाणी समिती नेते गोपाळ पाटील, श्री पांडुरंग सावंत, माजी आमदार कै. वसंतराव पाटील यांच्या कुटुंबीयांशी, तालुका पंचायत माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य वंदना अशोक पाटील त्यांच्या घरी जाऊन कार्यकर्त्यांनी गाठीभेटी घेतल्या.
- तसेच ओंकार सोसायटी व माऊली सोसायटीच्या अध्यक्ष व संचालकांच्या भेटी घेतल्या. यामधे प्रामुख्याने श्रीकांत सावंत, प्रभाकर पाखरे, पुंडलिक वड्डेबैलकर, अर्जुन सिद्धानी, संतोष पाटील, मर्याप्पा पाखरे, सोमनाथ येरमाळकर, तसेच पंचायत चे माजी अध्यक्ष व विद्यमान मेंबर श्री हनुमंत मेलगे, सुरेश मेलगे वगैरे उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी गर्लगुंजी काही प्रमुख मंडळी तसेच जेष्ठ मंडळींच्या गाठीभेटी घेऊन डॉक्टर अंजली निंबाळकर यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. महिला पंचायत उपाध्यक्ष रेखा कुंभार यांच्या घरी जाऊन पंचायत अध्यक्ष ललिता कोलकार, उपाध्यक्ष रेखा कुंभार, सदस्या अनुपुर्णा बुरूड तसेच सविता सुतार आणि वंदना पाटील या महिला सदस्यांनीही यावेळी डॉक्टर अंजलीताई निंबाळकर या आपल्या तालुक्याच्या माजी आमदार असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यात चा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
गर्लगुंजी : येथे बैठकीत… माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य हनुमंत मेलगे, समवेत पांडुरंग सावंत व गावातील काही ज्येष्ठ कार्यकर्ते.
- गर्लगुंजी पीकेपीएस चे अध्यक्ष श्री राजू सिद्धानी यांची पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली व त्यांनाही डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या पाठीशी उभे राहावे व आपल्या मदतीची अपेक्षा असल्याची विनंती केली. दरम्यान येथील पतसंस्थेच्या कार्यालयात एक चर्चात्मक बैठक घेण्यात आली या बैठकीत ग्रामपंचायत सदस्य व माऊली सोसायटीचे चेअरमन हनुमंत मेलगे, मर्याप्पा पाखरे, पुंडलिक वड्डेबैलकर, रोहन पाटील यांनी आपापली मते मांडतांना आमचा ताईंनाच पाठींबा असल्याचे सांगितले.
तोपिनकट्टी गावातही कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी!
- तोपिन कट्टी गावातही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. येथील गजानन खांबले यांच्या घरी एक छोटीशी बैठक घेऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
- यावेळी ॲड इश्वर घाडी साहेब, महादेव कोळी, प्रसाद पाटील, लक्ष्मण कसर्लेकर, सुरेश दंडगल, प्रमोद सुतार महादेव घाडी, जोतीबा गुरव व महादेव गुरव, नारायण खानापूरी, गोपाळ गुरव, तोहीत चादखण्ण्वर, संतोष पाटील, विनोद कुंभार, रोहन पाटील, कल्लाप्पा लोहार, संघाप्पा कुंभार, साईश सुतार, सुर्यकांत कुलकर्णी, विशाल देसाई, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.