Oplus_16777216

Oplus_16777216

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
KLE शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटल बेळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत देसाई आणि गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्यात प्रदीर्घ चर्चा गर्लगूंजी, निट्टुर, तोपिनकट्टी, बरगाव, बैलुर.या गावांना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दत्तक घेनार.
गर्लगुंजीसह इतर पंचायतींना आठवड्यातून एक किंवा दोन दिवस एमबीबीएस एमडी डॉक्टर आरोग्य तपासणीसाठी गावात उपलब्ध असणार आहेत, त्याचबरोबर मोफत ॲम्बुलन्स सेवा, मोफत किंवा एकदम कमी दरात औषधे त्याचबरोबर या गावातून जे रोगी हॉस्पिटलमध्ये जातील त्यांना मोफत आरोग्य तपासणी, त्याचबरोबर ऑपरेशन किंवा इतर खर्चिक बाबीसाठी वेगवेगळ्या स्कीम मधून बिल मोफत करण्यासाठी प्रयत्न किंवा अत्यल्प दरात ऑपरेशन आणि ट्रीटमेंट केली जाणार आहे.
बऱ्याच दिवसापासून प्रसाद पाटील यांनी याचा पाठपुरावा करत होते. KLE संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या जन्मदिनापासून या योजनेचा शुभारंभ होणार आहे असे KLE शताब्दी चारिटेबल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत देसाई यांनी याविषयी चर्चा करताना सांगितले. यावेळी जनसंपर्क अधिकारी प्रभावती उपस्थित होत्या. त्याचबरोबर निटूर ग्रामपंचायतचे सदस्य सदस्य नागेश नार्वेकर हे ही उपस्थित होते उपस्थित होते.आपल्याला या हॉस्पिटल मधून जन संपर्क अधिकारी असलेले संतोष,विजय आणि सागर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. गरीबांना अत्यल्प दरात उपचार मिळतात त्यामुळे एक हजार पेक्षा जास्त पेशंट ना आपण इथून चांगले करून घेतले असल्याचे यावेळी प्रसाद पाटील यांनी सांगितले.

या हॉस्पिटल च्या ब्लड बँक मधून ही भरपूर गरजूंना रक्त देता आल्याचे,आणि इतर हॉस्पिटल मधील पेशंट चे जीव वाचवील्याचे समाधान मिळाले असे ही प्रसाद यांनी सांगितले.थील डॉक्टर्स,नर्स आणि इतर official स्टाफ भरपूर सहकार्य करतात. सदर योजनेचा लाभ रेशन कार्ड,आधार कार्ड,यशस्विनी,वाजपेयी आरोग्य श्री, आणि इतर योजना मधून पेशंट ना लाभ मिळविता येतो.तरी नागरिकांनी या हॉस्पिटल आणि योजनांचा फायदा घ्यावा असे आव्हान प्रसाद पाटील यांनी केले आहे..

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us