Screenshot_2025-07-28-17-54-47-14_680d03679600f7af0b4c700c6b270fe7

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

शुक्रवारपासून सुरू झालेल्या श्रावण महिन्यात काही अनोखे योग आले आहेत. यावर्षी १० वर्षांनंतर श्रावणात अंगारकी संकष्टीचा योग आला आहे. यापूर्वी १ सप्टेंबर २०१५ रोजी अंगारकी संकष्टी आली होती. सन १९९८ या सालाप्रमाणे यंदाही श्रावणातील चारपैकी तीन मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी उपवासाचे दिवस आले आहेत.

आज 29 जुलै रोजी पहिल्या मंगळवारी नागपंचमी आहे. ५ ऑगस्टला पुत्रदा एकादशी, १२ ऑगस्टला अंगारकी संकष्टी, १९ ऑगस्टला एकादशी असे उपवासाचे दिवस आहेत. यंदा श्रावणात एकूण ५ शुक्रवार आहेत. पैकी शुल्क पक्षात तीन शुक्रवार आहेत. त्यामुळे ८ ऑगस्टला तिसऱ्या शुक्रवारी ते व्रत करणे.

जन्माष्टमीचा उपवास शुक्रवारी (दि. १५) आहे. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी काहींच्या घरी जिवतींचे महालक्ष्मी) पूजन, श्रवण प्रथा असते. शुक्रवारी जन्माष्टमीचा उपवास असल्याने उपवास नाही,

अंगारकी संकष्टी हे हिंदू धर्मातील एक तिथी व्रत आहे. ज्यावेळी संकष्टी मंगळवारी येते त्याला अंगारकी संकष्टी म्हणतात. यावर्षी श्रावण महिन्यात १२ ऑगस्टला अंगारकी संकष्टी आहे. यापूर्वी असा योग १ सप्टेंबर २०१५ मध्ये आला होता. श्रावण महिन्यात संकष्टी असली तरी गणेश पूजेसाठी दुर्वाच वाहतात. फक्त भाद्रपद महिन्यात दुर्वांबरोबरच बेल, तुळस दोन्हीही वाहतात. यानंतर आता ८ ऑगस्ट २०२८ मध्ये श्रावणामध्ये अंगारकी संकष्टीचा योग आहे.

राखी नारळी पौर्णिमा स्वतंत्र नारळी पौर्णिमा प्रामुख्याने कोकणामध्ये साजरी होते. सूर्यास्ताच्या आधी पौर्णिमा असते, शुक्रवारी (८ ऑगस्ट) नारळी पौर्णिमा साजरी करावी. परंपरेप्रमाणे यात्रा, रथ मिरवणूक काढता येईल. सूर्योदयादरम्यान ९ ऑगस्टला राखीपौर्णिमा आहे. त्या दिवशी वेळ, मुहूर्ताचे कोणतेही बंधन नाही. दिवसभर रक्षाबंधन करावे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us