चापगाव (प्रतिनिधी) सालाबाद प्रमाणे चापगाव येथील श्री जागृती देवस्थान श्री फौंडेश्वर देवाचा वार्षिकोत्सव येत्या 04 व 05 फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. या निमित्ताने शनिवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता श्री फोंडेश्वर देवाचा पालखी सोहळा होणार आहे. त्यानंतर रात्री 09 वा. मंदिरासमोर स्वागत समारंभ व त्यानंतर 11 वाजता मंदिरासमोर इंगळयांचा कार्यक्रम कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. 05 फेब्रुवारी रोजी सकाळी 07 वाजल्यापासून सायंकाळी 08 वाजेपर्यंत श्री फौंडेश्वर मंदिरासमोर नवसफेड आधी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री 09 वा. श्री फोंडेश्वर देवाचा परतीचा पालखी सोहळा होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री फोंडेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री फोंडेश्वर देवस्थानला पुरातन इतिहास
येथील फोंडेश्वर देवस्थानला पुरातन काळाचा इतिहास आहे. या ठिकाणी असलेले फोंडेश्वर देवस्थान महाभारतातील हस्तीनापूर साम्राज्याचे हंसंध्वज राजा यांच्या काळातील राजवटीशी संबंधित असल्याचे मानले जाते. जेंव्हा अश्वमेघ यज्ञाचा घोडा पृथ्वीभ्रमण करत होता. त्यावेळी तो घोडा हंसध्वज राजाचे पुत्र सूरत आणि सुधनवा यांनी अडवून अर्जुनाशी घनघोर युद्ध केले. या युद्धाला भगवान श्रीकृष्ण साक्षी होते. अर्जुनाप्रमाणे सुधन्ववाहि श्रीकृष्ण भक्त होता. दोघांच्या युद्धात श्रीकृष्णाला साक्षी ठेवून घनघोर युद्ध झाले. यामध्ये सुरत, सुधनवा वीरगतीला प्राप्त झाले. दोघेहि योद्धे वीर अर्थात पुंढ होते. म्हणून या देवस्थानला फोंडेश्वर असे कालांतराने नाव पडले. यामुळे आजहि या ठिकाणी लहान फोंडेश्वर व मोठा फोंडेश्वर अशा दोन मूर्त्या एकाच मंदिरात स्थापित आहेत. यापैकी एका देवाच्या नावे गोड नैवेद्य, तर एकाच्या नावे मांसाहारी नैवेद्य करण्याची प्रथा आहे. दरवषा माघ महिन्याच्या पौर्णिमेला हि यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते