खानापूर /प्रतिनिधी : गेल्या आठवड्याभोरा पासून चर्चेत असलेले शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत असलेले श्रीमान के. पी. पाटील यांचा प्रचार दौरा जोमात सुरू आहे. खानापूर तालुक्याच्या अनेक भागात आपल्या समर्थक कार्यकर्त्या समवेत के. पी. पाटील यांनी प्रचाराला जोर आणला आहे. एकीकडे त्यांच्या उमेदवारीवरून खलबते सुरू असताना पाटील मात्र आपला हेका कायम ठेवून तालुक्यात प्रचार करत आहेत.खानापूर तालुक्यात शिवसैनिक मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत करत प्रचारात सहभागी होत असल्याचे के पी. पाटील यांचे म्हणणे आहे.
खानापूर तालुक्याच्या लोंढा भागातील अनेक खेड्यात त्यांनी गेल्या दोन दिवसात संपर्क दौरा केला शिवाय शनिवारी गर्लगूंजी भागातील अनेक ठिकाणी त्यांनी प्रचार राबवला. बरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व गावांमध्ये देखील त्यांनी प्रचारसभा घेऊन आपली ध्येय धोरणे व शिवसेनेचे कार्यप्रणाली यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी अनेक महिला वर्ग व युवकांनी त्यांच्या प्रचार मध्ये सहभाग दर्शवला आहे.