खानापूर /प्रतिनिधी:
खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार के. पी. पाटील यांनी खानापूर शहरात सोमवारी पदयात्रा कडून घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. खानापूर शहरातील विविध भागात त्यांनी आपला भरजरी प्रचार केला.
यावेळी खानापूर स्टेशन रोड, चिरमुरकर गल्ली, देसाई गल्ली, विठोबा देव गल्ली, बाजार पेठ, आदी भागातून त्यांनी आपली शेकडो कार्यकर्त्यांसह पदयात्रा काढली व प्रचार केला. यावेळी शिवसेना उमेदवार म्हणून त्यांच्याकडे शिवसैनिकातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांनी प्रचाराला वेग आणला आहे.
खानापूर तालुक्यात त्यांचा हा प्रचार अनेक शिवसैनिकांना चैतन्य देणारा असल्याने अनेक कार्यकर्ते त्यांना मदत करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.