खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
- खानापूर तालुक्याच्या दक्षिण टोकावरील शेवटचे गाव म्हणजे पूर. पूर गाव हे आळणावर रामनगर रस्त्याला गोधोळी, गोदगिरी हून जोडणारे गाव. या गावचा संबंध खानापूर तालुक्याशी असला तरी व्यवहार मात्र आळणावरला जोडले जातात. त्यामुळे या गावाला जोडणारा पूर ते आळणावर हा संपर्क रस्ता अत्यंत धोक्याचा बनला आहे. खानापूर तालुक्याच्या हद्दीत येणारा रस्ता व नाल्यावरील पूल हा धोकादायक असल्याने शालेय विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला पडताना दिसतोय. नाल्यावर असलेला पूल जेमतेम ट्रॅक्टर जाण्या इतका रुंद आहे. या फुलाचे कपडे पूर्णतः निकामी झाले असून हा पूलही कमकुवत झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या पुलावरून येणे जाणे कठीण जाते अनेक वेळा शालेय विद्यार्थी पडल्याचेही प्रकार घडले आहेत. अशा या गावाला जोडणाऱ्या रस्त्याची सुविधा शालेय विद्यार्थ्यांची समस्या विद्यमान आमदार, खासदार यांनी घेऊन या गावची समस्या दूर करावी अशी मागणी येथील नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांनी केली आहे.
- सदर पुलाच्या दुतर्त शेतीवाडी आहे. त्यामुळे बैलगाड्या घेऊन शेतकऱ्यांची नेहमी या रस्त्यावरून ये जा असते. पूर भागातील अनेक विद्यार्थी आळनावरला शाळेला जातात . या गावावरून गोघोळी, गोदगिरी, तावरकट्टी, बिष्टेन हट्टी या गावांचा अधिक संबंध येतो. त्यामुळे हा महत्त्वाचा संपर्क रस्ता असला तरी विकासापासून वंचित आहे यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी आपले लक्ष द्यावे अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते अप्पाराव पाटील, धर्मराज पाटील, संदीप पाटील, मोहन बांदेकर, अशोक भजंत्री , प्रकाश झनकट्ठी व बीजेपी कार्यकर्ते ज्योतिबा सुतार यांनी केली आहे.