खानापूर लाईव्ह न्यूज /प्रतिनिधी :
खानापूर तालुक्यातील कापोली (के.जी.) येथे रविवारी दि. 03 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण तसेच शिवरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळी धार्मिक विधींसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्यानंतर शिवस्मारकाचे भव्य अनावरण होणार आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून हा सोहळा भक्तीमय आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा केला जाणार आहे.
प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान :
दुपारी १२ वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील (सातारा) यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या विचारांनी युवकांना प्रेरणा मिळणार असल्याने या व्याख्यानाकडे विशेष लक्ष लागले आहे.
सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण, शिवस्मारक चौथऱ्याचे उद्घाटन तसेच भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री सिंगनाथजी महाराज (श्री क्षेत्र बालेवाडी मठ) भूषविणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून श्री. मनोहर गणपतराव देसाई आणि श्री. शिवाजी गुणाजीराव देसाई उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती अनावरण श्री. प्रमोद रामचंद्र देसाई यांच्या हस्ते होणार असून शिवस्मारक चौथऱ्याचे अनावरण श्री. विद्याधर श्रीपती देसाई (माजी ए.एस.आय. पोलीस सेवा, पुणे) यांच्या हस्ते पार पडणार आहे. शिवस्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार श्री. दत्तात्रय लक्ष्मण देसाई (मलबाद) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
लोकप्रतिनिधींची ही विशेष उपस्थिती!
दीपप्रज्वलन सोहळ्यासाठी आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर, अरविंद पाटील, डॉ. अंजलीताई निंबाळकर, दिगंबरराव पाटील, धनश्री सरदेसाई यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
दुपारी 12 वाजता प्रमुख वक्ते म्हणून प्रा. नितीन संपतराव बानगुडे पाटील (सातारा) यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या भाषणाकडे युवकांसह शिवप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे . सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.