IMG-20260428-WA0000

कर्नाटकचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) मा. श्री. हेमंत निंबाळकर यांना पितृशोक झाला असून, खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या सासऱ्यांचे दुःखद निधन झाले आहे.
श्री. मधुकरराव बळवंतराव निंबाळकर (वय ८७ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने निंबाळकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर मंगळवारी दुपारी १२ वाजता वैकुंठभूमी, शिवाजी पूल, पंचगंगेच्या किनारी, कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेससह सर्व काँग्रेस कार्यकर्ते व तमाम हितचिंतकांनी निंबाळकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना.

Do Share
error: Content is protected !!
Call Us