पणजी: बुधवार दि. १० मे या दिवशी गोव्यात काम करणाऱ्या कर्नाटकातील मतदारांना गोवा सरकारने कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीनिमित्त भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. त्याची अधिसूचना सरकारने काढली आहे. बुधवार या दिवशी कर्नाटकात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तेथील अनेक मतदार गोव्यात नोकरी, कामधंद्यानिमित्त वास्तव्य करतात. त्यांना मतदान करता यावे म्हणून ही भरपगारी सुट्टी देण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील कामगार, सरकारी खात्यामधील रोजंदारी कर्मचारी, खासगी क्षेत्रातील कर्मचारी, कामगार अशा सर्वांना ती भरपगारी सुट्टी लागू असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले
आहे.