खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यात यावर्षी दरवर्षीप्रमाणे पावसाने सरासरी गाठली नाही. यामुळे खानापूर तालुका दुष्काळी परिस्थितीत अडकला आहे. गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने पिके कोमजून जाऊन पिकांची वाढ खुंटली असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना कृषी खात्याच्या सर्वेत खानापूर तालुक्याचा समावेश न करता राज्यातील अन्य तालुके दुष्काळग्रस्त करणे म्हणजे खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावर हा होणारा अन्याय आहे. यासाठी सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारे अधिकृत घोषणा केली नाही, यासाठी या दुष्काळी परिस्थितीत खानापूर तालुक्याचाही समावेश करावा यासाठी बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी विशेष प्रयत्न हाती घ्यावेत व मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला सदर बाब आणून खानापूर तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात यावा तसे न झाल्यास तालुक्यातील जनतेला खडे आंदोलनाला उभे राहावे लागेल असा इशारा या निवेदनाद्वारे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तहसीलदारांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी गोपाळराव देसाई अध्यक्ष म ए समिती, दिगंबरराव यशवंतराव पाटील माजी आमदार, मुरलीधर गणपतराव पाटील कार्याध्यक्ष, आबासाहेब नारायणराव दळवी सरचीटनीस, संजीव रामचंद्र पाटील खजिनदार, पांडुरंग तुकाराम सावंत उपरखजिनदार, मोहन रामू गुरव हेब्बाळ, शिवाजी कल्लाप्पा पाटील कुपटगिरी, नारायण रामचंद्र लाड जळगे, मारुती देवाप्पा गुरव खानापूर, देवापा महादेव भोसले, राजाराम सात्ताप्पा देसाई शिवाजीनगर, ब्रम्हानंद जोतीबा पाटील करंबळ, प्रकाश विठ्ठलराव चव्हाण खानापुर, रुक्माणा शंकर जुंझवाडकर खैरवाड, आर एम जुंझवाडकर खैरवाड, कृष्णा म्हात्रू मन्नोळकर नायकोल, मष्णु नारायण धबाले झाड अंकले, गोपाळ मुरारी पाटील गर्ल गुंजी. अनंत मष्णू पाटील खैरवाड, शंकर आप्पाणा गावडा माणिकवाडी, श्री सदानंद राजाराम पाटील गर्लगुंजी, पुडीक रामचंद्र पाटील करंबळ, महादेव नारायण पेडणेकर, मरू पाटील हारूरी, ज्ञानेश्वर क पाटील नागुरर्डा, मधुकर एन पाटील हारूरी, वेंकाप्पा नारायण गुरव शेडेगाळी, शामराव क पाटील खानापूर, हे समिती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಸರಾಸರಿ ಮಳೆ ಸುರಿದಿಲ್ಲ. ಇದರಿಂದ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕು ಬರ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸಿಲುಕಿದೆ. ಕಳೆದೊಂದು ತಿಂಗಳಿಂದ ಅತಿವೃಷ್ಟಿಯಿಂದ ಬೆಳೆಗಳು ಒಣಗಿ ಬೆಳೆಗಳು ಕುಂಠಿತಗೊಂಡು ಬರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ತಲೆದೋರಿದ್ದು, ಕೃಷಿ ಇಲಾಖೆಯ ಸಮೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕನ್ನು ಸೇರಿಸದೇ ರಾಜ್ಯದ ಇತರೆ ತಾಲೂಕುಗಳು ಬರಪೀಡಿತವಾಗಿದ್ದು, ಈ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯವಾಗಿದೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ಸರಕಾರ ಇನ್ನೂ ಅಧಿಕೃತ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಹೀಗಾಗಿ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕನ್ನೂ ಈ ಬರ ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಸೇರಿಸಬೇಕು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವ ಸತೀಶ ಜಾರಕಿಹೊಳಿ ವಿಶೇಷ ಪ್ರಯತ್ನ ನಡೆಸಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕನ್ನು ಸೇರಿಸಬೇಕು. ಬರಗಾಲದ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿದೆ.ಇರಬೇಕು ಎಂಬ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ತಹಸೀಲ್ದಾರ್ಗೆ ಹೇಳಿಕೆ ಮೂಲಕ ನೀಡಲಾಗಿದೆ.