हुबळी : खानापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येणाऱ्या मुख्य बेळगाव _पणजी राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत खानापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, चोरला, जांबोटी नूतन राष्ट्रीय महामार्ग तसेच होनकल ते लोंडा अनमोड दरम्यानचा रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी खानापूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठल हलगेकर सह भाजपच्या शिष्टमंडळाने हुबळी येथील महामार्ग प्राधिकरण खात्याचे वरिष्ठ प्रोजेक्ट अधिकारी के. आर. भुवनेश्वर यांची भेट घेऊन केली.
या शिष्टमंडळात आमदार विठ्ठल हलगेकर सह भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, सदानंद पाटील आदीवक्ते चेतन मनेरिकर, श्रीकांत इटगी यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते राजेंद्र आदी उपस्थित होते.
यावेळी सदर शिष्टमंडळाने खानापूर तालुक्यातील बऱ्याच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने हाती घेण्यात आलेला बेळगाव° पणजी राष्ट्रीय महामार्गचे काम अर्धवट बेळगाव पासून खानापूर पर्यंतचा महामार्ग पूर्ण झाला असला तरी होनकल पासून लोंढा अनमोड पर्यंतचा रस्ता पूर्ण होणे बाकी आहे. किमान या रस्त्याची एकेरी बाजू पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावी व या भागातील नागरिकांना सुलभता करून द्यावी अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे खानापूर शहरांतर्गत रुमेवाडी क्रॉस परिसरातील पावसाळ्यात होणारी रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता याची तातडीने खबरदारी घ्यावी व पावसाळ्यापूर्वी याचे फेरडांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
वास्तविक हा शहरांतर्गत महामार्ग वन टाइम डेव्हलपमेंट अंतर्गत आराखडा करण्यात आला आहे. परंतु या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाल्यानंतर होणार आहे. पण गेल्या दोन वर्षात इकडे राष्ट्रीय महामार्ग ही पूर्ण नाही, दुसरीकडे शहरांतर्गत रस्ता ही पूर्ण नाही यामुळे शहरांतर्गत रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव पिरणवाडी ते चोरला हा राज्यमार्ग आता महामार्ग प्राधिकरणामध्ये समावेश करण्यात आला असून यासाठीही विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. रस्ता तातडीने दुरुस्ती करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी वरिष्ठ अधिकारी भुवनेश्वर यांनी सदर रस्त्याचे काम भीमगड अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या भागात जवळपास पाच किलोमीटर जातो यासाठी दरम्यानच्या रस्त्यासाठी केंद्रीय लवा हरित लवादाकडून परवाना मिळणे बाकी आहे त्यामुळे ते काम थांबले असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार हलगेकर यांनी रस्त्याचे काम परवाना मिळाल्यानंतर करा पण तो पूर्वी खानापूर तालुक्याच्या हद्दीत येणारे रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्त्यावरील अपघात टाळावेत अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील बायपास रस्ता किंवा महामार्गात गेलेल्या रस्त्याची नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांना तातडीने मिळवून देण्यात यावी अशी ही मागणी या शिष्टमंडळाने यावेळी केली आहे.