खानापुरात ‘जेसीबी’ की विदाई! असोग्यात नवरदेवानं नवरीला चक्क ‘बकेट’मध्ये बसवून नेलं; पहायला झाली तुफान गर्दी!
खानापूर : लग्न म्हटलं की बँड, बाजा, डॉल्बी, नाचणारे मित्र आणि सजवलेली चारचाकी हे आता ठरलेलंच. पूर्वी बैलगाडीतून वरात निघायची, नंतर कार आली, मग लक्झरी गाड्या आल्या… पण खानापूर तालुक्यातील असोगा गावात मात्र वराने थेट “जेसीबी”वर एन्ट्री करत सगळ्यांनाच थक्क केले!
असोगा येथील जेसीबी मालक शिवाजी यांचा गावातीलच कोमल यांच्याशी विवाह पार पडला. पण लग्नापेक्षा जास्त चर्चा झाली ती त्यांच्या भन्नाट वरातीची! सजवलेल्या जेसीबीमध्ये नवदाम्पत्य बसले आणि मागे डॉल्बीच्या तालावर मित्रमंडळींचा भन्नाट जल्लोष सुरू झाला.
गावकऱ्यांनीही हा अनोखा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. काही जण म्हणाले,
“आतापर्यंत संसाराचा पाया मजबूत असावा असं ऐकलं होतं… पण इथे तर पाया खोदणारी मशीनच आली!” 😄
तर काहींनी गंमत करत विचारलं,
“वरात आहे की रोडवर्कचं उद्घाटन?” 😂
डॉल्बीच्या आवाजात आणि जेसीबीच्या उंचीवरून निघालेली ही वरात संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली. सोशल मीडियावरही या हटके वरातीची जोरदार चर्चा सुरू असून, “जेसीबीवाला नवरा” अशीच वराची ओळख झाली आहे.
एकंदरीत, खानापुरातील या लग्नाने सिद्ध केलं की,
“आजच्या काळात प्रेमाला आणि वरातीला कोणतीही लिमिट नाही!” 😄
जेसीबी की खुदाई नाही, तर ‘वरात’ चर्चेत!
लोकांना वाटलं जेसीबी काहीतरी रस्ता खोदण्यासाठी आलाय की काय? पण जेव्हा फुलांनी सजलेला तो ‘अवजड रथ’ समोर आला आणि त्यात नवरदेव-नवरी थाटात बसलेले दिसले, तेव्हा अख्ख्या गावाची पावलं तिथेच थबकली. पूर्वी बैलगाडी, मग कार आणि आता थेट जेसीबी! या अनोख्या प्रयोगाने पारंपारिक वरातीला ‘आधुनिक आणि जंगी’ फोडणी दिली.
डॉल्बीचा कडकडाट आणि जेसीबीचा स्वॅग!
शिवाजी स्वतः जेसीबी मालक असल्याने त्यांनी आपल्या व्यवसायालाच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदाचा भाग बनवलं. डॉल्बीच्या तालावर तरुणांनी ठेका धरला होता, तर जेसीबीच्या बकेटमध्ये बसलेलं हे नवदांपत्य सर्वांच लक्ष वेधून घेत होतं. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाने हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
सध्या या ‘लार्जर दॅन लाईफ’ वरातीची चर्चा फक्त असोग्यातच नाही, तर संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक म्हणतायत, “नादच खुळा! नवरदेवानं तर थेट ग्राऊंड लेव्हलला जाऊन राडा केला!”