Oplus_16908288
खानापूर : येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयात ७८ व्या एनसीसी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयातील एन सी सी विभागाने याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. जे. बी. अंची होत्या.
एनसीसी छात्राना उद्देशून म्हणाल्या की“देश सेवेत एनसीसी चे योगदान मोठे आहे.गेल्या आठ्यात्तर वर्षापासून लाखो छात्र देशसेवेसाठी एनसीसीने तयार केले आहेत.एनसीसीच्या माध्यमातून एक आदर्श नागरिक,सच्चा देशभक्त,एक उत्तम नेतृत्व निर्माण कण्यात एनसीसी अग्रेसर आहे.याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या देशाचे विद्यमान पंतप्रधान होत.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्या शालेय जीवनात एनसीसी छात्र होते.एक एनसीसी छात्र देशाचे पंतप्रधान होऊ शकतात.हे विद्यार्थ्यांच्यासाठी उत्तम उदाहरण आहे”असे विचार त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला पाहुणे म्हणून डॉ. व्ही.एम.तिर्लापूर उपस्थित होत्या.त्यांनी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्व विशद केले.
कार्यक्रमाला प्रा.कपिल गुरव,डॉ.सुनंदा कुरणी यांची विशेष उपस्थिती होती.उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी लेफ्टनट,डॉ. आय. एम. गुरव,सूत्रसंचालन राजश्री गावडा हीने केले तर आभार ओमकार पत्री यांने व्यक्त केले.या प्रसंगी महाविद्यालयातील एनसीसी छात्र बहुसंख्येने उपस्थित होते.