Oplus_16908288

Oplus_16908288

खानापूर लाईव्ह न्यूज /प्रतिनिधी :

तालुक्यात ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बाहेरील जिल्ह्यातून भरपूर असे शेळ्या मेंढ्या चे कळप आपल्या खानापूर तालुक्यात येत असतात,लाळ्या खुरकत चे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर मृत्युमुखी पडतात. त्यामुळे गाई, बैल मद्ये याचे परिणाम जास्त आढळतात. त्यावर ही तालुक्यातील शिल्लक गावामध्ये लसीकरण करून घ्यावे, व शेतकरी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण करावी,अशा आशयाचे निवेदन गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी पशुवैद्यकीय उपसंचालक याना दिले. त्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुळट्टी आणि लाईव्ह स्टॉक अधिकारी गुरव उपस्थित होते. याच बरोबर पशुवैद्यकीय खात्याकडून पुरविल्या जाणाऱ्या योजना सर्व नागरिका पर्यंत पोहचवा आणि तळागळातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा या विषयी ही चर्चा करण्यात आली.,जास्तीत जास्त जनावरांना लसीकरण केल्याबद्दल पशूवैद्यकीय खात्याचे अभिनंदन प्रसाद पाटील यांनी केले. यावेळी नामदेव कोलकार,कल्लपा लोहार,सुनील कोलकार,जोतिबा सुतार,सतीश बुरुड,गणेश देसाई,ओमकार कुंभार,सुरेश पाटील उपस्थित होते.

Do Share
error: Content is protected !!
Call Us