IMG-20250223-WA0007

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:

नंदगड येथील लक्ष्मीदेवी यात्रेचा शनिवारी अकरावा दिवस तरीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शनिवार असल्याने नंदगडसह तालुक्याचा गावागावांतील सरकारी नोकर व शालेय विद्यार्थी यात्रा उत्सवात सहभागी झाले होते. त्यातच आंबील गाडे मिरवणूक काढण्यात आल्यामुळे सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. वाद्यांच्या गजरात आंबील गाड्यांसमोर तरुण व तरुणीनी ठेका धरला होता. आंबील गाडे मिरवणुकीतील आकर्षक देखावे पाहण्यासाठी भाविकांनी नंदगडमध्ये प्रचंड गर्दी केली होती. लक्ष्मीदेवी यात्रा कमिटीने दिलेल्या वेळेनुसार सायंकाळी ७ वा. आंबील गाड्यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. एका पाठोपाठ एक असे आंबील गाडे मिरवणुकीत सहभागी झाले होते.

सर्वप्रथम देवरकर बन यांचा आंबिल गाडा, त्यानंतर जुनेपाटील बन यांचा आंबिल गाडा, सातगावडा बन, बापू गावडा बन, वरची गल्ली, मातकांडे गल्ली आंबील गाडा व कोलेकर बंधूनी सादर केलेल्या आंबील गाड्यांचा समावेश होता.

देवरकर बन आंबिल गाड्यासमोर स्वरांगण ढोल ताशा पथक येळ्ळूर यांचे वाद्य, तर लक्ष्मी-विष्णू अवतारसादर करण्यात आला होता. जुने पाटील बन यांनी विद्युत रोषणाई व डॉल्बीच्या आवाजात आपला आंबील गाडा घोड्याच्या रथावर बसलेले राम, सीता, लक्ष्मण, हनुमानसहित अयोध्या आगमनाचा देखावा सादर केला होता. सातगावडा बन यांनी स्थात बसलेल्या विठ्ठल-रखुमाईची सेवा करणाऱ्या संत तुकाराम महाराजांचा देखावा सादर केला होता. भातकांडे गल्लीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देण्याचा प्रसंग दाखवला होता.

प्रत्येक आंबील गाडी वाल्यांनी डॉल्बी आवर्जून आणली होती. आंबील गाडा मिरवणुकीत टाळ मृदंगांच्या गजरात भजन करणारे वारकरी सहभागी झाले होते. प्रत्येक बनातील लोकांनी वेगवेगळा पोशाख परिधान केला होता. महिलांनी एकच प्रकारचा पोशाख केला होता.गाड्यांच्या मिरवणुकीत युवक युवतींनी नृत्याचा आनंद लुटला. रात्र उशिरापर्यंत आंबील गाडा मिरवणूक सुरूच होती. भगवे फेटे व भगवे झे यामुळे परिसर भगवामय झाला होता.

आज यात्रेचा शेवटचा दिवस

नंदगड लक्ष्मीदेवीची यात्रा दि. १२ फेब्रुवारीपासून मोठ्या उत्साहात सुरू आहे. देवीचा विवाह सोहळा, देवीची हातावरून मिरवणूक, रथोत्सव, गदगेवर स्थानापन्न, ओट्या भरण्याचा कार्यक्रम, आंबील गाडे मिरवणूक आदी धार्मिक कार्यक्रमांसह विविध मनोरंजनाचेही कार्यक्रम यात्रा काळात झाले, रविवार दि. २३ रोजी सायंकाळी लक्ष्मीदेवीची गदगा परिसरात मिरवणूक व सायंकाळी ७ वाजता लक्ष्मीदेवीचे सीमेकडे प्रयाण होऊन यात्रेची सांगता होणार आहे.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 48;
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us