Screenshot_20250223_083808

खानापूर ; स्टेशन रोड खानापूर येथील रहिवासी व माजी आमदार कै. व्ही वाय चव्हाण यांच्या पत्नी अन्नपूर्णा विठ्ठलराव चव्हाण (वय 87 वर्ष) यांचे आज रविवार दि. 23 रोजी पहाटे 6.30 वाजता हृदयविकाराने निधन झाले. अंत्यसंस्कार आज सायंकाळी 4.00 वाजता खानापूर येथील हिंदू स्मशानभूमीत होणार आहेत. त्यांच्या पश्चात चार मुलं व दोन विवाहित मुली जावई नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व माजी आमदार कै. व्ही वाय चव्हाण यांच्या त्या पत्नी  होत. तर समितीचे नेते प्रकाश चव्हाण यांच्या मातोश्री होत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीमध्ये आपले पती स्वर्गीय व्ही वाय चव्हाण यांच्या सोबत सीमा चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता. त्या चव्हाण कुटुंबीयांच्या प्रेरणास्थान होत्या.

Do Share
error: Content is protected !!
Call Us