खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचा पहिल्या टप्प्यातील 30 महिन्याचा कालावधी गेल्या पाच मेला संपला आहे. त्यामुळे आता आगामी 30 महिन्याच्या कालावधीसाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी कोणते आरक्षण येणार? याकडे सर्व नगरसेविका नगरसेवकासह शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
खानापूर नगरपंचायतीवर गेल्या अडीच वर्षात अध्यक्ष पद सामान्य गटासाठी तर तर उपाध्यक्ष मागासवर्गीय वर्ग महिला गटासाठी आले होते. 30 महिन्यासाठी लक्ष्मी अंकलगी यांनी उपाध्यक्षपद सांभाळले, तर पहिल्या 30 महिन्याच्या कालावधीत दोन नगराध्यक्ष होऊन गेले. त्यामध्ये मजहर खानापुरी यांनी पहिली दोन वर्षे आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. व या पदावर पुढील सहा महिन्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक नारायण मयेकर यांची बिनविरोध निवड झाली होती. पण आता त्यांचाही कार्यकाल गेल्या 5 मे ला पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता खानापूर नगरपंचायतीवर प्रशासकीय कामकाज लवकरच हाती येणार आहे.