खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
खानापूर तालुक्यातील लक्केबैल, लोकोळी व जैनकोप परिसरात असलेल्या डोंगरी पठारित एका बिबट्याचा वावर असल्याची जोरदार चर्चा सुरु असून यामुळे गाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तिन्ही गावच्या बाजूला एक डोंगर पठार आहे. या पठारेत गेल्या 31 जुलै रोजी एक बिबट्या काही लोकांच्या निदर्शनास आला होता. पण काहीतरी दुसरे असावे असा संशय नागरिकांच्या निर्माण झाला. मात्र काल 1 ऑगस्ट रोजी परिसरात चार पाच कुत्र्यांचा फडशा पडल्याचे दिसून आल्याने हा बिबट्याचा प्रताप असल्याची खात्री झाली आहे. त्यामुळे गाव परिसरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतवडीकडे जाणाऱ्या महिला वर्गातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी वन खात्याने या परिसरात सापळा असून त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी लक्केबेल ग्रामस्थांनी केली आहे. वन खात्याने याची पडताळणी करून हा बिबट्या नसून चिता आहे असे सांगितले आहे. व या चर्चेचा बंदोबस्त करण्याची आम्हीह वन खात्याने दिले आहे पण तोपर्यंत सतर्कता म्हणून ग्रामस्थांनी गावात डांगोरा ही पेटवला आहे. खरंतर लकेबैल हा भाग मध्यवर्ती व नदीकाठाच्या पलीकडे आहे त्यामुळे हा बिबट्या (चित्ता ) नेमका या भागात कुठून आला याची मात्र नागरिकात चर्चा आहे.