खानापूर : सीमाभागात सुरू असलेल्या कन्नडसक्ती विरोधात तसेच मराठी भाषिकांना मराठी भाषेमध्ये परिपत्रके मिळावीत यासाठी 11 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे, यासंदर्भात विचारविनिमय करण्यासंदर्भात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तरी आजी -माजी लोकप्रतिनिधी तसेच समितीप्रेमी कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई तसेच सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.