Oplus_16777216

Oplus_16777216

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहिले पाहिजेत. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आरोग्य संपत्ती टाकण्यासाठी प्रयत्न केला तर भावी आयुष्यात आपले जीवन उज्वल होईल. अल्पवयामध्ये अनेक विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात आहेत हे चुकीचे आहे वाढत्या वयामध्ये व्यसन हे शरीराला धोकादायक आहे त्यामुळे शरीराची अपेक्षित वाढ होत नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी व्यसनापासून पूर्णतः दूर राहावे. असे आवाहन नंदगड पोलीस खाण्याचे पीएसआय एस एस बदामी यांनी व्यक्त केले शुक्रवारी तालुक्यातील गोधोळी येथील सह्याद्री हायस्कूलमध्ये आयोजित व्यसनमुक्ती अभियान मध्ये ते बोलत होते. यावेळी परयत संघाचे जिल्हा संचालक दत्ता नारायण बिडकर, ग्रामपंचायत सदस्य नागेंद्र तांबेडकर, सुधीर चव्हाण, बाळकृष्ण सुतार, भीमाप्पा भजत्रि यासह शाळे मुख्याध्यापक एन ए पाटील, श्रीमती एस एल पाटील, श्री एन टी पाटील,श्री एस करंबळकर, श्री एन बी जाधव, श्रीमती जे ए पाटील, श्री डी.पी कित्तूर श्री आर ए गुरव आधी उपस्थित होते.

Do Share
error: Content is protected !!
Call Us