- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: गेल्या 30 वर्षात भारतीय जनता पार्टीचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी खानापूर तालुक्याकडे केलेला कानाडोळा व विकासाकडे केलेले दुर्लक्ष याचे उत्तर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी देऊ शकत नाहीत. केवळ दिल्ली त मोदीजी यांच्या नावाचा वापर करत मोदीजीकडे बघा आणि भाजपला मतदान करा! याव्यतिरिक्त खानापूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांच्याकडे कोणतेच विकासाभिमुख उत्तर नाही. यासाठी खानापुरातून आपल्या समाजातील एका नेतृत्वाला व या तालुक्याच्या माजी आमदार म्हणून काम केलेल्या डॉक्टर निंबाळकर यांना काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याच्या इतिहासात पहिल्यांदाच खानापूर तालुक्यातून उमेदवारी दिली आहे. हा आमच्या तालुक्याचा स्वाभिमान असताना इतर पक्षाच्या सर्व लोकांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून केवळ तालुक्याच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून डॉक्टरांजलीताई निंबाळकर यांना भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन तालुका ग्रामपंचायत युनियनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी केले शुक्रवारी पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
- यावेळी बोलताना पुढे विनायक मुतगेकर म्हणाले की, पहिलीच वेळ खानापूर तालुक्याचा उमेदवार खासदार होणार यात शंका नाही. आज तलुक्याचे भरघोस मतदान हे दिल्ली दरबारी आपला आवाज ठरणार आहे. तालुक्याच्या समस्या दिल्ली लोकसभेत मांडण्यासाठी खानापूर तालुक्यातील जनतेने डाॅ अंजलीताई निंबाळकर याना भरघोस मतानी निवडूण द्या. असे सांगीतले.
- कबनाळी (ता.खानापूर) येथे श्री पांडुरंग अखंड नाम सप्ताह सोहळ्याला शुक्रवारी दि.१८ रोजी प्रारंभ झाला .
- यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिताराम राणे होते. मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वलन व विविध देवदेतांच्या फोटोचे पुजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिर्जे, खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर, रमेश पाटील ,राजेश पाटील,पुन्नापा बिरजे, संजय कांबळे,सहदेव दळवी,जयवंत गावडे,दतू देसाई गावचे नागरीक उपस्थित होते.
- यावेळी बोलताना यशवंत बिरजे म्हणाले, आज कर्नाटक सरकारने पाच गॅरंटी योजना अंतर्गत गोरगरिबांच्या खिशात अर्थसहाय्य व मदतीचा हात पुढे केला आहे. आज डॉक्टर अंजली निंबाळकर सारख्या एका सुशिक्षित महिला उमेदवाराला काँग्रेस पक्षाने दिलेली उमेदवारी ही स्वाभिमानात्मक आहे. आज काँग्रेस पक्षाने राज्यात दिलेले वचन पाळले आहे आता केंद्रातही सरकार आल्यास प्रति महिना साडेआठ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे शिवाय कर्जमाफीसह अनेक योजना सुरू करण्याची हमी ही दिली आहे. कुटूंबाला फायदेशीर अशा योजना सुरू केल्याने कुटूंबाला प्रपंच चालविणे सोईचे झाले. तेव्हा येत्या लोकसभा निवडणुकीत खानापूरच्या डाॅ अंजली निंबाळकर याना भरघोस मताने निवडुन आणू असे मत प्रगट केले.
- संजय कांबळे, विठ्ठल सावंत ,दत्तू देसाई आदीची भाषणे झाली. कार्यक्रमात राजाराम धुरी पी के पी एस निलावडे चेअरमन यानी प्रास्ताविक केले. व शेवटी आभार मानले.