खानापूर /प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील बहुतांश गावात जल जीवन मिशन अंतर्गत शुद्ध पेयजल पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. केंद्र सरकारची ही महत्वकांक्षी योजना प्रत्येक गावात पोहोचवण्यासाठी संबंधित ग्रामीण पाणीपुरवठा व निर्मल विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. ऑनलाइन टेंडरद्वारे अनेक कंत्राटदरानी या कामाच्या निविदाही घेतले आहेत. पण अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे अर्धवट असल्याने गावात नाहक अडथळा व जुन्या पाणीपुरवठा योजनाची ऐशी तैशी झाल्याने ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना हा त्रास सहन करावा लागत आहे. या रागाने खानापूर तालुक्यातील लिंगणमठ ग्रामपंचायत क्षेत्रातील चुंचवाड ग्रामस्थांनी संतापाने लिंगनमठ ग्रामपंचायत टाळे ठोकले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती की चुंचवाड गावामध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गेल्या चार महिन्यापूर्वी गावात पाईप लाईन घालण्यासाठी खुदाई करण्यात आली आहे. परंतु ती व्यवस्थित बुजून त्यावर कॉंक्रिटीकरण करण्याकडे कंत्राट दराने दुर्लक्ष केले आहे. शिवाय या पाईपलाईन घालते वेळी जुनी पाणीपुरवठा योजना पूर्णतः निकामी झाल्याने गावातील पाणीपुरवठ्यातही बिघाड निर्माण झाली आहे. जल जीवन मिशन ही योजना प्रारंभी चांगली वाटली, परंतु कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतिला तसेच संबंधित कंत्राटदाराला अनेक वेळा सांगून ही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप ग्रामस्थांनी लिंगनमट ग्रामपंचायतीलाच ठाळे ठोकण्याचा निर्णय घेतला व शुक्रवारी जोरदार निदर्शने करून ग्रामपंचायतला टाळे ठोकले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामपंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते. कंत्राटदराच्या हलगर्जीपणामुळे ग्रामपंचायत समितीलाही याचे बोलणे सोसावे लागत आहे. असाच प्रकार तालुक्यातील अनेक गावात निर्माण झाला आहे.