IMG-20240404-WA0019

प्राथमिक, माध्यमिक अन कॉलेज विद्यार्थ्यांचा होणार सहभाग! खानापुरात दिनांक 7 व 8 एप्रिल रोजी आयोजन!


खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

  • बेळगाव मराठा मंडळ शिक्षण संस्था संचलित जिल्ह्यातील सर्व इंटर स्कूल्स व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स मेनिया 2024 या उपक्रमांतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन येत्या 7 व 8 एप्रिल रोजी करण्यात आले आहे बेळगाव जिल्ह्यातील जवळपास 39 प्राथमिक माध्यमिक व पदवी पूर्व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग या क्रीडा स्पर्धांमध्ये होणार असून या क्रीडा स्पर्धा खानापूर येथील मराठा मंडळ सेकंडरी स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहेत. सदर स्पर्धा प्राथमिक माध्यमिक व पदवीपूर्व अशा तीन गटात होणार आहेत. यामध्ये तिन्ही गटाकरिता रिले, लांब उडी, उंच उडी ट्रिपल जंप, त्याचप्रमाणे कबड्डी खो-खो थ्रो बॉल हॉलीबॉल असे ग्रुप इव्हेंटस ही खेळवले जाणार आहेत. त्याचप्रमाणे माध्यमिक व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी रनिंग इव्हेंट्स ठेवण्यात आले आहेत.
  • विशेष म्हणजे त्यांन गटाकरिता मराठा मंडळ खानापूर क्रीडांगणाच्या मैदानावर कुस्ती स्पर्धांचे ही आयोजन करण्यात आले आहे शाळा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेसाठी लाल मातीच्या मैदानाची ही जय्यत तयारी हाती घेण्यात आली आहे. यासर्व क्रीडा स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना आकर्षक चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे. तरी याचा सर्व मराठा मंडळ संचलित शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच खानापूर शहर व परिसरातील पालक वर्ग नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
  • या स्पर्धाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजश्री नागराजु संस्थेचे अनेक विश्वास व मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us