Oplus_16908288
खानापूर प्रतिनिधी : पुरातन काळापासून प्रत्येक गावात स्थापित मंदिरे व त्या गावचे रितीरिवाज अबाधित ठेवण्यासाठी तसेच भविष्यात धार्मिक परंपरा टिकवण्यासाठी भावी पिढीला प्रेरित करणे काळाची गरज आहे. प्रत्येक गावात मंदिरे आहेत वार्षिक सणवाराचे रीती रिवाज आहेत ते टिकवण्याचे काम केले तरच आपला धर्म टिकेल. हिंदू धर्मातील आचार विचार समाजात कायम रुचवण्यासाठी लिखाणाच्या स्वरूपात ठेवा ठेवणे काळाची गरज असून आज चापगाव येथील पुरातन काळाच्या इतिहासावर आधारित शोध चंपावती नगरीचा पुस्तकाच्या निर्मितीमुळे भावी पिढीला धार्मिक रितीरिवादाची प्रेरणा मिळेल असे विचार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले.

खानापूर तालुक्यातील चापगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित हिंदू धर्म सभा तथा पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. आवरोळी मठाचे पूज्य श्री चन्न बसव देवरू यांच्या दिव्य सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमात दक्षिण मुखी श्री मारुती मंदिराचे उद्घाटन व कार्यक्रमात दीप प्रज्वलन कित्तूर – कलमठ मठाचे पूज्य श्री मडिवाळ राजयोगेन्द्र महास्वामी, कक्केरी मठाचे पूज्य श्री राजानंद भारती स्वामी, हीडकल मठाचे पूज्य श्री आडसिद्धेश्वर महास्वामी, अंबरगट्टी मठाचे पूज्य श्री वीरेश्वर महास्वामी, गंदीगवाड मठाचे मृत्युंजय महास्वामी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते व नूतन मंदिराच्या उभारणीत योगदान दिलेले मारुती चोपडे यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीशक्ती मैत्री हिच्या भरतनाट्याने करण्यात आले. शोध चंपावती नगरीचा पुस्तक प्रकाशन थाटात… खानापूर तालुक्यातील चापगाव गावच्या पुरातन इतिहासावर आधारित पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांनी शोध चंपावती नगरीचा या पुस्तिकेची रचना केली आहे या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा या व्यासपीठाच्या माध्यमातून स्वामीजींचे असते करण्यात आला. गावच्या स्थापनेपासून गावातील अनेक मंदिरांचा इतिहास रितीरिवाज धर्म परंपरा, प्रत्येक घराण्यातील कुळी परंपरा तथा गावच्या विकासात योगदान दिलेल्या महनीय व्यक्तींची ओळख व त्यांचा परिचय अशा अनेक विषयाला अनुसरून या पुस्तकाची रचना त्यांनी केली आहे. या पुस्तकाच्या रचनेबद्दल व्यासपीठावरून मान्यवरांनी अभिनंदन केले.
एकट्यानेच उभारले गावासाठी मंदिर…

चापगाव येथील दक्षिण मुखी श्री मारुती मंदिर हे पुरातन काळाचा ठेवा आहे. लहान आणि जुन्या असलेल्या या मंदिराच्या निर्मितीसाठी गावातील उद्योजक व ग्रामपंचायतचे माजी उपाध्यक्ष मारुती चोपडे यांनी स्वखर्चाने डबल 30 लाख रुपये खर्चून सुंदर अशा मंदिराची उभारणी केली या मंदिराचा लोकार्पण सोहळा स्वामीजी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावरून गावासाठी योगदान दिलेल्या मारुती चोपडे यांचा अनेकांनी जाहीर सन्मानही केला. धर्मजागृतीसाठी युवकांची गरज… प्रत्येक गावात पुरातन मंदिरे आहेत ती जतन करण्याचे काम युवकांनी केले पाहिजे धार्मिक रितीरिवाज परंपरा जतन करण्यासाठी अशा मंदिरांना आर्थिक बळ देऊन त्यांची पुन्हा निर्मिती करणे व धर्माचरण करणे काळाची गरज आहे मारुती चोपडे सारख्या युवकाने स्वखर्चाने गावासाठी तब्बल तीस लाख रुपये खर्च करून मंदिराची उभारणी करून ते लोकांपर्यंत करणे आणि भव्य दिव्य असा सोहळा करणे क्वचितच आहे अशा मारुती चोपडे यांच्या कार्यास अभिनंदन. तथा गावचा इतिहास भावी पिढीला कळवा यासाठी पुस्तकाची निर्मिती करून शोध चंपावती नगरीचा या पुस्तिकेला निर्मितीत योगदान दिलेल्या पिराजी कुऱ्हाडे यांचाही यावेळी गौरव केला व प्रत्येक गावात असे युवक तयार व्हावेत व धर्माचरण राखावे असे विचार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले.

धर्म जागृतीसाठी महिलांसह युवकांची गरज…
अलीकडे पाश्चातीकरणाचा लोंढा वाढत चालला आहे भारतीय संस्कृती ही मोठी आहे हिंदू धर्म रितीरिवाजात आपण जगत असताना परप्रांतीय संस्कृतीचा संस्कार आजच्या युवक व युवती मध्ये घडत आहे. यासाठी युवकांनी धर्म जागृतीसाठी कार्य करावे व मारुती चोपडे व पिराजी कुराडे सारख्या युवकांनी गावासाठी केलेल्या या योगदानाचा इतर युवकांनीही आदर्श घ्यावा असे विचार माजी आमदार अरविंद पाटील यांनी मांडले. यावेळी व्यासपीठावर आबासाहेब दळवी, अमृत शेलार, चेतन मनेरिकर, धनश्री सरदेसाई, रुखमाना झुंजवाडकर, मल्लाप्पा मारीहाळ, बर्मानी पाटील, किशोर हेब्बाळकर, भालचंद्र पाटील, प्रशांत लकेबैलकर,बाजीराव पाटील, नामदेव कदम यासह गावातील अनेक ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते कार्यक्रमात सूत्रसंचालन व आभार पत्रकार पिराजी कुराडे यांनी मांडले.
हिंदू धर्म जागृती सभा…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदुत्व…. अनिल महाराज देवळेकर यांचे प्रबोधन..
“हिंदुत्वाचा कणा आणि स्वाभिमानाचा जाज्वल्य इतिहास म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज! अनिल महाराज देवळेकर आपल्या ओघवत्या वाणीतून शंभूराजांच्या बलिदानाचे महत्त्व विषद करताना सांगतात की, शंभूराजांनी केवळ राज्य राखले नाही, तर हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण स्वतःच्या रक्ताने केले.”
शंभूराजे केवळ योद्धे नव्हते, तर ते ‘बुधभूषणम्’ सारख्या ग्रंथाचे रचयिता होते. त्यांनी लहानपणीच हिंदू धर्मातील शास्त्रे, पुराणे आणि वेदांचा सखोल अभ्यास केला होता. हिंदू संस्कृतीवर होणारे वैचारिक आक्रमण परतवून लावण्यासाठी त्यांनी लेखणी आणि तलवार दोन्हीचा वापर केला.
त्याकाळी दक्षिणेत आणि गोव्यात मोठ्या प्रमाणावर सक्तीने धर्मांतर केले जात होते. शंभूराजांनी या धर्मांतराला कडाडून विरोध केला. ज्या हिंदूंना सक्तीने धर्मांतरित केले गेले होते, त्यांना शुद्धीकरणाद्वारे पुन्हा स्वधर्मात घेण्याचे धाडस त्यांनी दाखवले.
अनिल महाराज सांगतात की, औरंगजेबाने शंभूराजांसमोर तीन अटी ठेवल्या होत्या: १. स्वराज्याचे किल्ले द्या, २. खजिना द्या आणि ३. इस्लाम स्वीकारा. पण शंभूराजांनी गर्जून सांगितले, “सात काय, सातशे जन्म घेतले तरी स्वधर्म सोडणार नाही!”
३२ दिवस चाललेल्या अमानुष छळाला सामोरे जाताना शंभूराजांनी एकदाही मान झुकवली नाही. त्यांच्या देहाचे तुकडे झाले, डोळे काढले गेले, पण जिभेवर ‘हर हर महादेव’ आणि मनात हिंदू धर्माप्रती निष्ठा होती. त्यांच्या या बलिदानामुळेच पूर्ण हिंदुस्थान पेटून उठला आणि औरंगजेबाचे स्वप्न मातीत मिळाले.
देवळेकर महाराज सांगतात, “शंभूराजांच्या रक्तात जिऊती होती आणि मनात पांडुरंगाची भक्ती.” वारकरी संप्रदायातील ‘धर्मरक्षण’ ही संकल्पना शंभूराजांनी प्रत्यक्ष जगून दाखवली.
“शंभूराजे जर त्या दिवशी झुकले असते, तर आज मंदिरांवर कळस दिसले नसते. त्यांनी स्वतःचे आयुष्य अर्पण केले जेणेकरून तुमचे आणि आमचे हिंदुत्व सुरक्षित राहावे. हेच त्यांचे खरे योगदान आहे!” असे कणखर विचार या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केले.