IMG-20240403-WA0015

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:

  • खानापूर तालुक्यातील हलसीवाडी येथे घरच्या परसुत ठेवण्यात आलेल्या एका गवतगंजिला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे. रात्रीच्या वेळी आग नेमकी कशी लागली याचा अंदाज आला नाही. मात्र यामुळे सदर शेतकऱ्याचे जवळपास पाच ट्रॅक्टर गवत जळून खाक झाल्याने शेतकऱ्याच्या जनावरावर उपासमारीची पाळी आली आहे.
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव रमेश गणपती देसाई रा.हलशीवाडी असे आहे. सदर शेतकऱ्याने पंधरा दिवसापूर्वीच आपल्या शेतातील गवत आपल्या परसू मध्ये आणून ठेवले होते. वास्तविक उन्हाच्या तडक्याने दुपारच्या वेळी आग लागणे हे अचानकपणे होऊ शकते मात्र रात्रीच्या वेळी आठच्या सुमारास आग नेमकी कशी लागली याचा अंदाज आला नाही. सदर आग कोणी जाणीवपूर्वक लावली की चुकून लागली असावी याचा शोध घेतला जात आहे. गवत गंजिला आग लागल्याचे कळतात गावातील नागरिकांनी पाणी आणून सदर आग विझवण्यासाठी ऑटोकाठ प्रयत्न केले. पण आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात येतात अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. व आग विझवण्यात आली जवळपास घरे व गाव असल्याने सतर्कता रकत गवतगंजीची आग आटोक्यात आणण्यात आली दरम्यान ग्रामपंचायत अध्यक्ष पांडुरंग बावकर, गावातील नागरिक निंगाप्पा होसूर नरसिंह घाडी यासह अनेक जण उपस्थित होते
  • .
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us