Screenshot_20250306_122104

खानापूर /प्रतिनिधी : भुत्तेवाडी ता. खानापूर येथे 37 वा पांडुरंग हरी नाम सप्ताह व गुरुपूजन कार्यक्रम येत्या रविवार दि. 9 मार्च पासून आयोजित करण्यात आला आहे.

हभप. गुरुवर्य वै. आप्पासाहेब वास्कर व हभप. वै. तात्यासाहेब वास्कर महाराज हभप. वै. विवेकानंद वास्कर महाराज पंढरपूर यांच्या कृपा आशिर्वादा रविवार दि. 09/03/2025 रोजी सकाळी 12 वा. विठ्ठल रखुमाई पूजन- हभप. कृष्णाजी नारायण पाटील, किरहलशी व हभप. अर्जुन लाड, विडी व उपस्थित संतांच्या हस्ते पोथी स्थापना होईल. अधिष्ठान श्री हभप. सातेरी शिवठणकर, माचिमह यांच्या हस्ते, 4 से 5 प्रवचन श्री. गुरु ह.भप. कौस्तुभ उर्फ (राऊ) मालक विवेकानंद वासकर महाराज, पंढरपूर यांचे प्रवचन व नंतर नामजप, 7 ते 9.30 हभप. भानुदास तळेकर कोल्हापूर यांचे किर्तन नंतर श्री. महालक्ष्मी महिला भजनी मंडळ किणये-बेळगांव यांचे भजन होईल व हरिजागर होईल, सोमवार दि. 10/03/2025 रोजी सकाळी 6 वा. काकड आरती, व सकाळी 9 ते 12 पर्यंत 9 वा व 12 वा अध्याय वाचन हरूप. अर्जुन लाड, बिडी, त्यानंतर, 4 से 5 तुकाराम गाथा भजन हभप. तुकाराम महाराज किरहलशी व हभप. परशराम महाराज हडलगा यांचे भजन होईल व नंतर हभप. विठ्ठल महाराज किरहलशी यांचे प्रवचन व नामजप होईल. रात्री 9 ते 12 ह.भ.प. पांडूरंग उपलानी महाराज, मु. अवचितवाडी, कोल्हापूर यांचे किर्तन होईल श्री सद्‌‌गुरु संमित सोंगी भजनी मंडळ कंदलगांव ता. करविर जि. कोल्हापूर यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल व त्यानंतर हरिजागर होईल. मंगळवार दि. 11/03/2025 रोजी पहाटे काकड आरती व गांवामध्ये दिंडी सोहळा होऊन दुपारी 12 वा. खिरापत व महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. तरी याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भूत्तेवाडी वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us