हडलगा; खानापूर तालुक्यातील हडलगा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री कलमेश्वर मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिराचा उद्घाटन कार्यक्रम आज सोमवार दि. 22 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्ताने रविवारी श्री कलमेश्वर मंदिराचा वास्तुशांती पार पडला. आज सोमवार दि. 22 रोजी सकाळी मूर्ती प्रतिष्ठापना व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मंदिराचे उद्घाटन खानापूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार श्रीमान विठ्ठल हलगेकर,माजी आमदार अरविंद पाटील सह भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या निमित्ताने अनेक मान्यवरांचा सत्कार , देणगीदारांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. रात्री 8 वाजता ह भ प गुरुवर्य एकनाथ वासकर महाराज पंढरपूर यांचे कीर्तन व निरूपण होईल. मंगळवार दि. 23 रोजी सकाळी श्री लक्ष्मीदेवी व मरेवा देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम व रात्री 10 वाजता हनुमान भजनी मंडळ हडलगा यांचा भजनी भारुडचा कार्यक्रम, बुधवार दि. 24 रोजी सकाळी श्री मारुती देवाचा अभिषेक , हुडगामा देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री 10 वाजता ‘शपथ तुला या मंगळसूत्राची ‘ हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दि. 25 रोजी रात्री 8 वाजता धार्मिक कार्यक्रम, भजनाचा कार्यक्रम. शुक्रवार दि. 26 मे रोजी थळ देवाची यात्रा व रात्री 10 वा कोल्हापूर येथील ‘तुफान आर्केस्ट्रा ‘ आयोजित करण्यात आला आहे. यामुळे आगामी पाच दिवस हडलगा गावात यात्रेचे स्वरूप राहणार असून याची ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे. याचा भाविकांनी व निमंत्रित मान्यवरांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे