खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे *मलप्रभा हायस्कूल चापगाव* *2002-03* च्या *इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुरु शिष्य स्नेहमेळावा रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025* रोजी *नागाण्णा होसमणी कॉन्वेंशनल हॉल, खानापूर* येथे आयोजित करण्यात आला होता.हा मेळावा मोठ्या थाटात पार पडला.
या कार्यक्रमाप्रसंगी सन 2002 -03 सालातील इयत्ता दहावीच्या वर्गातील 70 विद्यार्थ्यापैकी 51 विद्यार्थ्यांनी हजेरी दर्शविली व या बॅचचे गुरुजन *श्री. एम्. एम्.पाटील, श्री. बी. ए.पाटील, श्री. ए.टी..बेळगावी, श्री. वाय्. वाय्. पाटील, श्री.बी.जी.गौंडाडकर, श्री. बी. डी. पाटील व श्री.एम्.आय. पाटील* उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गुरुजनांचे पुष्प वर्षावाने स्वागत करत झाली. त्यानंतर प्रार्थना व राष्ट्रगीत घेण्यात आले तद्नंतर हयात नसलेले श्री ए. आर.घार्शी सर ,श्री डुकरे सर, शाळेचे शिपाई श्री महादेव पाटील, अटेंडर श्री अरुण कुलकर्णी तसेच वर्गमित्र राजेंद्र पाटील व उमेश जाधव या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर उपस्थित गुरुजनांच्या व वर्गमित्रमैत्रिणींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. श्री एम. एम. पाटील सर व बी ए पाटील सर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक कृष्णा कल्लाप्पा पाटील यांनी केले. या नंतर सर्व विद्यार्थ्यांचा परिचय व गुरुजनांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमधून नानासाहेब पाटील व अश्विनी बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले.सर्व गुरुजनानी आपले मनोगत व्यक्त करत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाविषयी बोलताना हा कार्यक्रम इतक्या भव्य आणि सुंदररीतीनेआयोजित केल्याबद्दल प्रशंसोद्गार काढले तसेच शाळेच्या विकासासाठी विद्यार्थ्यानी मदत करावी अशी सूचनाही केली व विद्यार्थ्यांनीही शाळेला वस्तूरुपात मदत करण्याची ग्वाही दिली.शाळेच्या वर्गातील छडी खाल्लेली आठवण जागी करण्यासाठी सर्वांनी सरांच्या हातून छडी हातावर मारून घेत शाळेच्या काळातील आठवणी जागे केल्या.भोजनानंतर मनोरंजनात्मक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यल्लाप्पा कुकडोळकर व संगीता घाडी यांनी केले.हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निंगाप्पा पाटील,म्हात्रू धबाले ,विजय हंगिरकर, शिवाजी बिर्जे, मारुती कृष्णा धबाले, गंगाराम हंगीरकर,यल्लाप्पा पाटील,तुळसा खांबले,रूपाली अंधारे, गीता खांबले, गीता देवलतकर, दीपा देवलतकरआदिनी विशेष परिश्रम घेतले. सर्व वर्ग मित्र-मैत्रिणीनी उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे भाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून भविष्यात आणखी अशा प्रकारचे कार्यक्रम आखले जातील असे सांगून कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली.