खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
आपकी बार मोदी सरकार, आपकी बार 400 पार,शिवाय हमारा परिवार मोदी परिवार संकल्पनेनुसार देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीच्या तक्तावर बसवण्यासाठी तसेच देशाला विकसनशील देश म्हणून जगाच्या आणण्यासाठी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत खानापूर तालुक्यातील उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना भरघोस मतांनी निवडून देऊन दिल्लीच्या तक्तावर पाठवावे. असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांनी केले. बुधवारी मुख्यमंत्र्यांचा धावता दौरा झाला. खानापूर येथील मांगरीस हॉल येथे खानापूर तालुक्यातील बुथ प्रमुख व तालुक्यातील प्रमुख नेते मडळींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी ते बूथ प्रमुखांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल होते.
यावेळी बोलताना प्रमोद सावंत म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक बुथवर पेज प्रमुखानानुसार काम झाले पाहिजेत. घराघरापर्यंत मोदीजी यांच्या कामाचा पाठपुरावा करून मतदारांना जागृत केले पाहिजे. सर्वसामान्य साठी राबवण्यात आलेल्या सर्व योजना आज तळागाळापर्यंत पोहोचवण्याची गरज घरोघरी जोपर्यंत योजना पोहोचणार नाही. तोपर्यंत मतदारांना मतदानाची इच्छा वाढणार नाही. यासाठी प्रत्येक बूथ प्रमुख कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार कार्याला लागावे व मतदानाची टक्केवारी वाढवून जास्तीत जास्त मतदान भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात आणून या भागाचा खासदार दिल्लीच्या तक्तावर पाठवावा असे त्यांनी सूचित केले. मुख्यमंत्री प्रमोद जी सावंत यांनी जिल्हा पंचायत निवांत प्रमुखांशी साधला व केलेल्या प्रगतीचा आढावाही घेतला.
काँग्रेस पक्ष हा परिवार वादी पक्ष-मुख्यमंत्री प्रमोद सावंत
- काँग्रेस विरोधात बोलताना ते म्हणाले काँग्रेस पक्ष हा केवळ फसवेगिरी चा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादासाठी कधीही काम करत नाही तो परिवारवादासाठी काम करतो. देशात गांधी परिवार होता आता कर्नाटकात चार ते पाच परिवार वाद आहेत. याउलट भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादासाठी काम करते. अशा या राष्ट्रवादी पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला स्वाभिमान राखत देशाच्या समृद्धीसाठी कार्यतत्व राहावे असे आवाहन केले.
तालुक्यातून लोकसभेला उच्चांकी मतदान देणार – आमदार विठ्ठल हलगेकर
यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, खानापूर तालुक्यातील जनतेने भाजपावर विश्वास ठेवून 92 हजाराचे मताधिक्य दिले. खानापूर तालुक्यातील जनतेचा भाजपवर व येथील कार्य करणाऱ्या नेतेमंडळीवर विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य आज प्रत्येक मतदारांच्या मुखात असल्याने यावेळी देखील उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रातील उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांना देखील असेच उच्चांकी मतदान खानापूर तालुक्यातील देण्यासाठी कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे यापूर्वीही झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत खानापूर तालुक्याने उच्चांकी मतदान दिले आहे तीच सरासरी यावेळी ही दिली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, निजद नेते नासिर बागवान जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल आदींनी यावेळी विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर धनश्री सरदेसाई, किरण येल्लूरकर, सुरेश देसाई, ज्योतिबा रे माने बाबुराव देसाई सह अनेक पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख उपस्थित होते.