- कुमठा: लोकसभेचे रणांगण दिवसेंदिव स्थापत चालले आहे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने प्रचारात मोठी आघाडी घेतली असून कारवार जिल्ह्यातून उच्चंकी मतदार देण्याचा निर्णय या भागातील काँग्रेस व जेडीएसच्या अनेक कार्यकर्त्यांनी घेतला आहे. जीडीएस चे या भागाचे नेते शाबरी यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच प्रवेश केला. शिवाय या कार्यक्रमा वेळी भव्य रॅली काढण्यात आली कुमठा पासून ते होणावर पर्यंत हजारो दुचाकी सारखाने रॅलीमध्ये सहभाग दर्शवला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या विजयाची जणू नांदी या भागातून सुरू झाली आहे
- डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून होण्णावर ते कुमठा अशी बाईक रॅली काढण्यात आली होती. हजारो बाईक्स या रॅली मधे सहभागी झाल्या होत्या …
- होण्णावर, भटकळ, कुमठा, अंकोला, कारवार या भागात ताईंनी प्रचाराच्या प्रचंड मोठी आघाडी घेतली असून विरोधकांचा प्रचारच दिसतं नसल्याचे जाणकार मंडळी सांगतात….कालच मुख्यमंत्री सिद्धरामय्या व डी के शिवकुमार यांनी ताईंसाठी कुमठा व मु्दगोड येथे दोन जाहीर सभा घेतल्या आहेत. शिरसी व यल्लापूर येथे सुद्धा ताईंना भरघोस पाठींबा असून यल्लापूर विधानसभा मतदार संघात होणार्या एकून मतदानापैकी ८०% मतदान हे कॉंग्रेस ला नक्कीच होईल.
- हल्याळ मतदार संघात जेष्ठ नेते आर व्ही देशपांडे , कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते जोरदार प्रचार यंत्रणा राबवित आहेत या मतदार संघात सुद्धा कॉंग्रेस लीडवर असणार आहे. खानापूर व कित्तूर मतदार संघात सुद्धा सामना अटीतटीचा होणार असून या दोन्ही मतदार संघात कॉंग्रेस पक्ष बाजी मारेल यात शंका उरली नाही.
भाजपकडून खोटा प्रचार
- खानापूर तालुक्यात विरोधक खोटा प्रचार करतं आहेत. कर्नाटकातील गॅरंटी करडा अंतर्गत देण्यात येणारे दोन हजार रुपये व इतर योजना ह्या मोदी सरकारने दिल्या असल्याचा कगावा करत मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्याचा खोटा प्रयत्न की काही भाजप प्रचार करत आहेत. त्यामुळे भाजपाच्या संघात खोटे बोलायची पद्धत आहे का असा प्रश्नही निर्माण होताना दिसतो आहे. भाजप सरकारने आतापर्यंत कोणत्या सर्वसामान्यांसाठी योजना आणल्या आहेत याचे उत्तर त्यांच्याकडे नाही केवळ श्रीमंतांना मदत करणे त्यांची कर्ज माफ करणे एवढेच त्यांना माहित आहे. महागाई चा बडगा पेट्रोल, डिझेल तथा गॅसची महागाई या सगळ्या गोष्टी उतरायला मोदी सरकारला का जमले नाही. याचे उत्तर ते देतील का? त्यामुळे खोटा प्रचार करून मते मागण्याचा प्रयत्न ही केवळ लबाडी असून अशांना मतदार गय करणार नाही. तालुक्यातील भाजपा च्या काही नेत्यांनी तर भाषणाचा स्तर इतका खाली नेला आहे की विचारायची सोय नाही. खालच्या पातळींवर जाऊन बोलायचे, खोटे बोलायचे हे नित्याचेच झाले आहे. अशांना चांगल्या संस्कारांची गरज आहे. असे प्रतिउत्तर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी यांनी दिले आहे.