खानापूर: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात बिन बुडाचे आरोप करत राज्य भाजपाने केलेल्या आरोपाचे समर्थन करत कर्नाटकाचे राज्यपाल गेहलत यांनी चौकशीला संमती देणे हे चुकीचे आहे. वास्तवात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोणताही गैरवावर अथवा भ्रष्टाचार केलेला नाही. मुडा जमीन प्रकरणाचा वाद अनाहक वादात हाणून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे हे चुकीचे आहे. भाजपच्या समर्थनार्थ राज्यपाल थावरचंद गेहलत यांनी घेतलेली ही भूमिका चुकीची असून त्यांनी तो आदेश मागे घ्यावा नाहीतर केंद्र सरकारने त्यांना कर्नाटकातून गो बॅक करावे अशी मागणी करत बेळगाव जिल्हाधिकारी यासमोर निदर्शने करण्यात आले. या निदर्शनात खानापूर तालुक्यातून शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शवला होता.
या आंदोलन प्रसंगी बोलताना खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले. कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय यांच्या नेतृत्वाखाली सरकार व्यवस्थितरित्या सुरू आहे दिलेल्या वचनाप्रमाणे अनेक विकासात्मक कामे पाच गारंटी योजना यशस्वी राबवत आहेत. कर्नाटकातील जनतेने 135 जागा देऊन कर्नाटकात सुबद्ध सरकार कार्यरत आहे. कर्नाटकात राबवत असलेल्या या योजना यशस्वी होत असल्याने भाजप पक्षाच्या लोकांनी नाहक मुख्यमंत्री सिद्धरामय यांच्यावर आरोपाचे पाढे गिरवले आहेत. त्याला कर्नाटकचे राज्यपाल थावरचांद गेलहत यांनी नियमबद्ध कारभार न चालवता भाजपचे बाहूले बनुन मुख्यमंत्र्यांच्या वर चौकशीच्या आदेशाला परवाना देणे हे चुकीचे आहे. याबद्दल कर्नाटकातून त्यांचा काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवला जात आहे. अशा राज्यपालांना कर्नाटकातून हटवावे अशी मागणी करत निदर्शने केली जात असल्याचे सांगितले.