गोवा: नुकताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत व त्यांच्या धर्मपत्नी सुलक्षणा सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले. खानापूर विधानसभा निवडणुकीत सौ.सुलक्षणा प्रमोदजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणा राबवण्यात आली. त्याला भरभरून यश आले.आपल्या निवडीत गोवा सरकारचे विशेषता मुख्यमंत्री प्रमोद सावंत व त्यांच्या धर्मपत्नी सौ सुलक्षणा सावंत यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याबद्दल खानापूरचे नवनिर्वाचित आमदार श्रीमान विठ्ठलराव हलगेकर यांनी गोवा येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांची कृतज्ञता व्यक्त केली व त्यांचा मनोभावे सत्कार केला.
यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत व आमदार विठ्ठल हलगेकर यांची गळा भेट झाली. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी यांनीही आमदार सरांचा श्रीफळ शाल घालून सत्कार केला. खानापूर तालुक्यातील गोवा राज्यात काम करणाऱ्या युवकांच्या समस्या वर ही चर्चा केली. व तसेच खानापूर तालुक्याच्या विकासासाठी शासकीय मदत करू असे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी खानापूरच्या आमदाराना आश्वासन दिले.
👇