IMG_20240416_211720
  • खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
  • देशाच्या लोकशाहीची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपकी बार 400 पार हा आकडा पार करण्यासाठी संपूर्ण देशातील भाजप कार्यकर्ता तन मन धनाने काम करत आहेत. देशाच्या तख्तावर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची नितांत गरज असून येत्या 2047 सालापर्यंत देशाला समृद्ध बनविण्याचा हेतू मोदी सरकारने घेतला आहे यासाठीच प्रत्येक लोकसभा क्षेत्र जिंकण्याची तयारी कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे. आज उत्तर कन्नड लोकसभा मतदार क्षेत्रात गेल्या 25 वर्षात कार्यकर्त्यांनी जो विश्वास अन ताकद दिली आहे. तीच ताकद व विश्वास या निवडणुकीतही राखावी व आपले उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना भरघोस मताने निवडून देण्यासाठी खानापूर तालुक्यातील मतदाराने पुन्हा एकदा सज्ज रहावे. यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने हर घर कार्यकर्ता निर्माण करून मतदानासाठी सज्ज रहावे असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले आहे. गेल्या दोन दिवसात खानापूर तालुक्यातील जिल्हा पंचायत निहाय बूथ प्रमुखांच्या व कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी बोलत होते. दोनच दिवसापूर्वी गर्ल गुंजी, नंदगड ,लोंडा, जांबोटी या भागात बैठका घेण्यात आल्या. या बैठकीला खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी आमदार अरविंद पाटील, माझी उपसभापती सुरेश देसाई, माजी सभापती सयाजी पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा रेमानी, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई, धनश्री सरदेसाई, राजश्री देसाई, चेतन मनेरिकर, परसराम चौगुले , मारुती पाटील, लक्ष्मण बामणे सह प्रत्येक विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us